अध्यक्षपदासाठी जगदीश निवृत्ती पांगारकर आणि सहअध्यक्षपदासाठी सुनिता भानुदास सोनवणे यांचा एका मताने अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पराभव झाला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी (दि.१८) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्वे यांची निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. अध्यक्षपदासाठी पांगरी येथील जगदीश निवृत्ती पांगारकर आणि मुसळगाव येथील रवींद्र सूर्यभान शिंदे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यात गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानात रवींद्र शिंदे यांना १० तर जगदीश पांगारकर यांना ९ मते मिळाली. अवघ्या एका मताने शिंदे विजयी झाले. सह अध्यक्षपदासाठी सुनिता भानुदास सोनवणे (९) आणि जयश्री संपत आव्हाड (१०) यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढाईत जयश्री आव्हाड यांनी अवघ्या एका मताने बाजी मारली. योजनेच्या सचिवपदी मनेगाव येथील ग्राम विकास अधिकारी एम. बी. यादव यांनाच सर्वानुमते कायम ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी मनेगाव येथील सरपंच सुनिता भानुदास सोनवणे, दापूरचे सरपंच रमेश आव्हाड, रामनगरचे सरपंच अनिल मंडले, पाटोळे येथील सुनील सांगळे, दोडी खुर्दचे सरपंच रमेश आव्हाड, गोंदेचे सरपंच अनिल तांबे, दातलीचे हेमंत भाबड, खोपडीचे सोमनाथ दराडे, खंबाळे येथील मिननाथ डावरे, दोडी बुद्रुकच्या सरपंच ज्योती भालेराव, धारणगावचे सरपंच परशराम शिरोळे, भोकणीचे सरपंच अरुण वाघ, कुंदेवाडीचे सरपंच रतन नाठे, दत्तनगरच्या प्रिया पालवे, धोंडवीरनगरचे शिवाजी सोनवणे, आटकवडे येथील शोभा वाघ आदी उपस्थित होते.
फोटो - १९ सिन्नर मनेगाव
सिन्नर तालुक्यातील मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले. समवेत समितीचे सदस्य व कार्यकर्ते.
===Photopath===
190621\133519nsk_27_19062021_13.jpg
===Caption===
फोटो - १९ सिन्नर मनेगाव सिन्नर तालुक्यातील मनेगावसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना समितीच्या अध्यक्षपदी रविंद्र शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले. समवेत समितीचे सदस्य व कार्यकर्ते.