सातपूर : गेल्या कित्येक दिवसांपासून मोठा उद्योग प्रकल्प नाशिकला येऊ शकलेला नाही. त्यामुळे आलेली मरगळ झटकण्यासाठी निमा या औद्योगिक संघटनेने थेट मुंबईत धडक देऊन मेक इन नाशिक, मॅग्नेटिक नाशिक आणि निमा इंडेक्स यासारखे उपक्रम राबवून नाशिकचे ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नांना राज्य सरकारकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसला तरी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी (म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहमुख्य कार्यकारी अधिकारी) नाशिकला दिलेल्या भेटीत जे काही सकारात्मक संकेत दिले आहेत त्यामुळे उद्योग वर्तुळात आशेचा किरण दिसू लागला आहे. मागील महिन्यात एमआयडीसीचे सहमुख्य अधिकारी अभिषेक कृष्ण यांनी नाशिक भेटीत नाशिक जिल्ह्याची विकसन क्षमता मोठी असल्याने औद्योगिक विकासाला चालना मिळावी म्हणून राजूर बहुला येथे १४४ हेक्टर जमीन भूसंपदनाला मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. तसेच दिंडोरी तालुक्यातील तळेगाव आणि अक्र ाळे भूखंडांचे लवकरच वाटप सुरू करण्यात येईल आणि अतिरिक्त ३७२ हेक्टर जमिनीपैकी २०६ हेक्टर जमीन ताब्यात असून, उर्वरित ३२ हेक्टर जमिनीचेदेखील लवकरच संपादन करण्यात येणार असल्याचे सांगितले. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनीही नाशिक भेटीत उद्योजकांशी बोलताना सांगितले की, नाशिकमध्ये अनेक उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक असून, त्यांच्यासाठी दिंडोरी आणि सिन्नरसह अन्य काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीकरिता अतिरिक्त भूसंपादनाचे नियोजन सुरू आहे.जूनअखेरपर्यंत होणार भूखंडांचे वितरणमोठी गुंतवणूक नाशिकमध्ये यावी याकरिता येथील क्षमता, कौशल्य, कामगार, पायाभूत सुविधा आणि माध्यमे यांच्याकडून एकत्रित प्रयत्न होण्याची गरज आहे. तळेगाव आक्र ाळे येथे पहिल्या टप्प्यातील भूसंपादन पूर्ण झालेले आहे. रस्ते, पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांची उभारणी पूर्ण करून भूखंडांचे वितरण जूनपर्यंत केले जाणार असल्याचे सूतोवाच केले.
उद्योग वर्तुळात आशेचा किरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:43 AM