नाशिक : बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असलेल्या क्रेडाई नाशिक मेट्रोची २०२१-२२ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या वर्षासाठी अध्यक्षपदी रवि महाजन यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी नरेश कारडा व कृणाल पाटील, तर मानद सचिव म्हणून गौरव ठक्कर तसेच कोषाध्यक्षपदी हितेश पोतदार यांचीदेखील निवड करण्यात आली आहे.क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष तसेच राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत राजेगावकर व राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना सल्लागार समितीचे प्रमुख जितुभाई ठक्कर तसेच अन्य माजी अध्यक्ष यांच्या समितीने ही निवड केली.गत वर्षात अध्यक्ष रवि महाजन यांच्या नेतृत्वाखाली कोविडच्या संकटकाळात क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे शहरामध्ये अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले होते. बांधकाम व्यावसायिकांसाठी युनिफाइड डीसीपीआर लागू करण्यात आल्याने त्यासंदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमदेखील रवि महाजन यांनी आयोजित केला होता.निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना महाजन यांनी विकसित करण्यासाठी शासन तसेच लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच नाशिकमध्ये नवे उद्योग व गुंतवणूक येण्यासाठीदेखील क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे प्रयत्न केले जातील. राष्ट्रीय उपाध्यक्षपदी राजेगावकर, सल्लागारपदी ठक्करबांधकाम व्यावसायिकांची देशातील शिखर संस्था क्रेडाईच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष जितुभाई ठक्कर यांची राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना सल्लागार समितीचे प्रमुख म्हणून व गौरव ठक्कर यांची राष्ट्रीय क्रेडाईच्या श्वेतपत्रिका समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ही निवड वर्ष २०२१-२०२३ या कालावधीसाठी राहणार आहे. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बैठकीत ही घोषणा करण्यात आली. क्रेडाई नाशिक मेट्रो व क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर यांनी या संस्थेसाठी भरीव कार्य केले असून, संघटना वाढीसाठी राज्यभरात क्रेडाईचे अनेक चॅप्टर सुरू केले आहेत. बांधकाम क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यासाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे.
क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवि महाजन यांची फेरनिवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 1:43 AM