नाशिक : व्यापा-यांकडून कमी भावाने शेतमाल खरेदी केला जात असल्याने शेतक-यांचा उत्पादीत माल हमीभावाने खरेदी करण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नाकडे मूग, उडीद, सोयाबीन उत्पादक शेतक-यांनी पाठ फिरविली आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात दोन खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्याला अल्प प्रतिसाद मिळाल्याने शेतक-यांना नोंदणीसाठी आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे.राज्य सरकारने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असून, त्यासाठी मूगाला ६९७५ रूपये, उडीद ५६०० रूपये व सोयाबीन ३३९९ रूपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. बाजारात व्यापा-यांकडून शेतक-यांची अडवणूक करून कमी किंमतीत शेतमाल खरेदी होवू नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतला असून, मूग व उडीद पिकासाठी २४ सप्टेंबरपासून शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली होती. तथापि, महिनाभरात फक्त मूगासाठी ४०० शेतक-यांनी तर उडीदासाठी दहा शेतकºयांनीच नोंदणी केली. सोयाबीनसाठी १ आॅक्टोंबरपासून नोंदणी सुरू करण्यात येवूनही त्यालाही जेमतेम ५० शेतकºयांनी नोंदणी करून प्रतिसाद दिला. बुधवार दि. २४ आॅक्टोंबर रोजी आॅनलाईन नोंदणीची अंतीम मुदत संपुष्टात आली. शासनाला अपेक्षित असलेला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मुग व उडीद पिकाची आॅनलाईन नोंदणीसाठी आता १५ नोव्हेंंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. या पिकांसाठी जिल्ह्यात येवला व लासलगाव खरेदी विक्री केंद्रांवर नोंदणी व खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकºयांनी सदरच्या केंद्रावर नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी केले आहे.
सोयाबीन, उडीद उत्पादक शेतकऱ्यांची विक्री केंद्राकडे पाठ
By श्याम बागुल | Published: October 25, 2018 2:55 PM
राज्य सरकारने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असून, त्यासाठी मूगाला ६९७५ रूपये, उडीद ५६०० रूपये व सोयाबीन ३३९९ रूपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. बाजारात व्यापा-यांकडून शेतक-यांची
ठळक मुद्देहमीभावाने खरेदी : आॅनलाईन नोंदणीसाठी दुस-यांदा मुदतवाढ