नाशिक : समाजामध्ये वाचन संस्कृती रुजावी व सर्व मुलांनी वाचन करावे यासाठी देशभरात १५ आॅगस्टपासून वाचन मोहिमेस सुरवात झाली असून, नाशिक जिल्ह्यामध्येही वाचन मोहिमेचा भाग म्हणून रोज एक नवीन गोष्टीचे पुस्तक डिजिटल स्वरूपात मुलाना व पालकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.आंतराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त रूम टू रीड संस्थेद्वारे दरवर्षी देशभरात १५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर २०२० पर्यंत शाळा, वस्ती व गाव स्थरावर वाचन मोहिम राबविली जाते. नोव्हेंबर २०१९ पासून नाशिकमध्ये राज्य शैक्षणिक संसोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे च्या मान्यतेनुसार, जिल्हा परिषद, नाशिक आणि विद्या प्राधिकरण, नाशिक यांच्या सहकार्यातून प्राथमिक शाळांकरिता वाचनालय विकासाचे कार्यक्रम सुरु करण्यात आले असून या कार्यक्रमांतर्गत २०२३ पर्यंतएकूण २४७ केंद्र स्थरीय वाचनालयाचेद्वारे ३ हजार२७७ जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील बालकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. नाशिक जिल्ह्यात २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यात सिन्नर, इगतपुरी, नाशिक आणि त्रंबकेश्वर या चार तालुक्यातीलएकूण ५९ केंद्राद्वारे ७८३ प्राथमिक शाळा मध्ये ह्यग्रंथालय विकासाचाह्ण कार्यक्रम सुरु केला आहे. परंतु, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यातरी, मुलाना वाचनासाठी डिजिटल स्वरूपात विविध गोष्टीची फ्लिप पुस्तके, गोष्टीचे मुखर वाचन व्हिडीओ, गोष्टीचे कार्ड तसेच घरी असताना पालक आपल्या मुलांना शिकण्यासाठी प्रभावीपणे सहाय्य्य करू शकतील करता येईल असे भाषा विकासाकरिता खेळांचे आॅडिओ पालक व मुलांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे, त्यातून मुलांचा वाचन कौशल्य विकसित होण्यास मदत होत असून सदर डिजिटल साहित्य या ४ तालुक्यातील जवळपास ४२ ते ४५ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत आहे.
जिल्ह्यात ८ सप्टेंबरपर्यंत वाचन मोहीमजिल्ह्यात ८ सप्टेंबरपर्यंत वाचन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 12:50 AM