शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

जिल्ह्यात संविधान प्रस्तावनेचे वाचन

By admin | Published: November 26, 2015 9:49 PM

संविधान दिन : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

नाशिक : संविधान दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. काही ठिकाणी संविधान प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. मनमाड : सार्वजनिक वाचनालयात गुरुवारी (दि. २६) संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते बळवंतराव आव्हाड, प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, संगणक अभियंता अंकीत गांधी हे व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी २६/११ हल्ल्यातील शहीद झालेल्यांना व शहीद कर्नल महाडिक यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. संविधानाच्या परिशिष्ट १ चे सामूहिक वाचन करण्यात आले. नितीन पांडे यांनी प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचा हेतू विशद केला. संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला जगण्याचा अधिकार दिला असल्याचे बळवंतराव आव्हाड यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले. हर्षद गद्रे व प्रदीप गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले. बळवंतराव आव्हाड व अंकीत गांधी यांनी विविध विषयांवरील बहुमूल्य ग्रंथसंपदा वाचनालयास भेट म्हणून दिली. यावेळी वाचनालयाचे संचालक किशोर नावरकर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, भाजपा शहर अध्यक्ष नारायण पवार, प्रमोद मुळे, कांतिलाल लुणावत, नीळकंठ त्रिभुवन, किशोर गुजराथी, शांतीलाल गांधी, ललीत भंडारी, अंकुश जोशी, नितीन अहिरराव, संदीप नरवडे, जय फुलवाणी, पीयूष गंगेले, दिलीप सूर्यवंशी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले. मनमाड : शहर रिपाइं शाखेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. येथील सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांच्या हस्ते मुख्याध्यापक सेबी कोेरिया यांना संविधानाचे तैलचित्र भेट म्हणून देण्यात आले. संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका युवा अध्यक्ष योगेश निकाळे यांनी सादर केले. यावेळी गंगाभाऊ त्रिभुवन, पी.आर. निळे, सुरेश जगताप, सुशील खरे, प्रदीप घुसळे, विलास अहिरे, भीमराव उबाळे, सुरेश शिंदे, जीवन अहिरे, धनंजय अवचारे, मंदाताई भोसले, मिलिंद उबाळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.मालेगाव : शहरासह परिसरात ठिकठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेण्यात येऊन डॉ. आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली.महिला महाविद्यालयश्रीमती पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात प्रा. अरुण शिंदे यांचे भाषण झाले. प्राचार्य प्रा. डॉ. उज्ज्वला देवरे यांनी मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाची विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांनी संविधानाचे वाचन केले.केबीएच विद्यालय, मुंगसेमुंगसे येथील केबीएच विद्यालयात अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीमती एस. डी. काकडे होत्या. त्यांनी प्रतिमापूजन केले. त्यानंतर सामूहिक संविधान म्हणण्यात आले. प्रास्ताविक जी. एन. सोनार यांनी केले. आर. ए. पवार यांनी आभार मानले.गो. य. पाटील विद्यालयजळगाव (निं) येथील गो. य. पाटील विद्यालयात अध्यक्षस्थानी सरपंच रोडू अहिरे होते. तंटामुक्तीचे रावण काळे, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व शिक्षकांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.नामपूर महाविद्यालयनामपूर येथील प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान पत्रिकेचे वाचन करण्यात आले. राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. एन. डी. पगार यांचे भाषण झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे होते.केबीएच विद्यालय, कॅम्पमालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. आर. पाटील होते. पाटील यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. पर्यवेक्षक एस. बी. वाघ यांनी संविधानाची शपथ दिली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सूत्रसंचालन आर. एम. धनवटे यांनी केले. आर. बी. बच्छाव यांनी आभार मानले.जि. प. उर्दू शाळा, नामपूरनामपूर येथील जि. प. उर्दू शाळेत संविधान दिनानिमित्त प्रभातफेरी काढण्यात आली. केंद्रप्रमुख अशोक पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शबाना बागवान, रईसा शेख, साजीद अहमद, हाजी जमीर पठाण, छोटे शेख अल्ताफ शहा, शिक्षक व पालक उपस्थित होते.र. वी. शाह विद्यालयमालेगाव येथील र. वी. शाह विद्यालयात वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक ललित तिळवणकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य संजय बेलन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रीमती व्ही. पी. आर्वीकर यांनी संविधानाचा उद्देश स्पष्ट केला. विशाखा शेवाळे या विद्यार्थिर्नीने मनोगत व्यक्त केले. श्रीमती एस. डी. कुलकर्णी, श्रीमती एस. पी. बेलन, अशोक तावडे यांनी मार्गदर्शन केले. संजय बेलन यांनी मनोगत व्यक्त केले. मराठी अध्यापक विद्यालयभायगाव रोड येथील मराठी अध्यापक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. झेड. पाटील होते. संयोजन श्रीमती मंगला पाटील यांनी केले. अहिरे यांनी आभार मानले.केबीएच विद्यालय, वडेलवडेल येथील केबीएच विद्यालयात अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. पी. कुवर होते. यावेळी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पर्यवेक्षक एस. सी. पवार, के. बी. अहिरे यांनी मार्गदर्शन केले.जनता विद्यालय, सारदेबागलाण तालुक्यातील सारदे येथील जनता विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक एस. टी. धोंडगे यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. उपशिक्षक व्ही. व्ही. शिरसाठ, डी. पी. सोनवणे, डी. एच. शिरुडे व विद्यार्थिनी हर्षाली देवरे, निकिता देवरे यांची भाषणे झाली. डी. पी. सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. डी. बी. देवरे यांनी आभार मानले.मालेगाव महानगरपालिकामालेगाव येथील मनपा सभागृहात संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान उद्देशिकेचे वाचन उपआयुक्त राजेंद्र फातले यांनी केले. यावेळी सहायक आयुक्त विलास गोसावी, नगरसचिव राजेश धसे, अग्निशमन विभागाचे अधीक्षक संजय पवार, खालीद महेवी, पंकज सोनवणे, दिनेश मोरे, जयपाल त्रिभुवन व कर्मचारी उपस्थित होते.केबीएच विद्यालय, शेरूळशेरुळ येथील केबीएच विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्रीमती के. आर. बाविस्कर होत्या. संविधान दिनानिमित्त एस. एम. चव्हाण, जे. एल. बच्छाव, एस. ए. निकम यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन डी. एस. वानखेडे यांनी केले. एस. वाय. वाघ यांनी आभार मानले.ब्राह्मणगावी संविधान दिन साजरायेथील बाजार चौकात सरपंच सरला अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. सरला अहिरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. ग्रामविकास अधिकारी पी. के. बागुल यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. बापूराज खरे, गुलाब खरे, राघोनाना अहिरे यांनी घटनेचे महत्त्व विशद केले.(लोकमत चमू)