सिन्नर : पुस्तक वाचनामुळे ज्ञानात भर पडते. जीवन संस्कारक्षम व सुसंस्कृत बनते. पुस्तकांना मित्र बनवून प्रत्येकाने नेहमी वाचन करावे. वाचन संस्कृती वाढवावी, असे आवाहन प्रा. शहाजी पाचोरे यांनी केले.
पाडळी येथे पाताळेश्वर विद्यालयात ‘वाचन संस्कृती’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. वाढदिवसानिमित्त विद्यार्थी विद्यालयास पुस्तक भेट देतात, तसेच लॉकडाऊन काळात शिक्षकांनी वाड्या-वस्त्यांवर जावून विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तके वाचनास दिल्याचे त्यांनी कौतुक केले. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी परिचय करून दिला. यावेळी बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, एस. एस. देशमुख, टी. के. रेवगडे, के. डी. गांगुर्डे, सी. बी. शिंदे, एस. दि. पाटोळे आदी उपस्थित होते.
फोटो - १४ पाडळी१
पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयात ‘वाचन संस्कृती’ व्याख्यानात बोलताना प्रा. शहाजी पाचोरे. समवेत शिक्षकवृंद.
140921\14nsk_35_14092021_13.jpg
पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालयात ‘वाचन संस्कृती’ व्याख्यानात बोलताना प्रा. शहाजी पाचोरे. समवेत शिक्षकवृंद.