प्रास्तविकात प्रा. डॉ. एकनाथ पगार यांनी वाचनाचे महत्व विषद करताना मनोरंजनाबरोबरच सर्वांगीण विकास व ज्ञानार्जन करण्यासाठी पुस्तकासारखा मित्र नसल्याचे मत व्यक्त केले. तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावे असे आवाहन केले.प्राचार्य अहेर यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बालसाहित्यिक संजय वाघ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘बांधिलकी’ नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. सातत्याने राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या ‘बांधिलकी’ नियतकालिकाचे कौतुक करीत त्यांनी आयुष्य समृद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यानी चौफेर वाचनावर भर द्यावा, असे आवाहन केले. यावेळी ग्रंथ वाचन करणाºया विद्यार्थी व पाहुण्यांना ग्रंथ भेट देण्यात आली. उपप्राचार्य व्ही. डी. सुर्यवंशी यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रा. मालती अहेर, डॉ. जयवंत भदाणे, प्राध्यापकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
देवळा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनी कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 7:01 PM