शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

माजी सैनिकांना घरपट्टीत सवलत देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:35 AM

शहरातील माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याच्या विषयावरून महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, शहरात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांची पडताळणी घरपट्टी विभागामार्फत करण्यात येणार आहे.

नाशिक : शहरातील माजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याच्या विषयावरून महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, शहरात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांची पडताळणी घरपट्टी विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर सवलतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तर दुसरीकडे घरगुती कचऱ्यातून सेंद्रिय खत तयार करणाºया करदात्यांना सवलत देण्याऐवजी त्यांना पुण्याच्या धर्तीवर कंपोस्ट किट सवलतीच्या दरात देण्याचा विचार सुरू आहे.महापालिकेच्या वतीने शहरात वास्तव्यास असलेल्या सर्वांकडूनच मिळकत कर म्हणजेच घरपट्टी घेतली जाते. मात्र, त्यात माजी सैनिकांनी देशासाठी सेवा केलेली असल्याने त्यांना घरपट्टी माफ करावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार महासभेत ठरावदेखील झाला आहे, परंतु त्यावर अद्याप निर्णय मात्र प्रशासनाकडून झालेला नाही. बुधवारी (दि.१८) जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजनिधी संकलनाच्या कार्यक्रमात यासंदर्भात आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ठोस घोषणा करावी, अशी माजी सैनिकांची अपेक्षा होती. मात्र आयुक्तांनी छाननीअंती याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेने यापूर्वी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या कालावधीत पहिल्या तीन महिन्यांत आणि तीही आॅनलाइन सवलत जाहीर केल्यानंतर त्याचा करदात्यांना लाभ झाला. मात्र महापालिकेला लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका माजी सैनिकांची संख्या पडताळून व्यवहार्य निर्णय घेणार असल्याचे कळते. दरम्यान, घरगुती कचºयाचे घरीच कंपोस्ट खतात रूपांतर करणाºया करदात्यांना घरपट्टीत सवलत देण्याची तयारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केली होती.नव्या वर्षात घोषणा शक्यमहापालिकेला घरपट्टीत सवलत देण्याचा निर्णय एकाएकी आर्थिक वर्षाच्या मध्येच जाहीर करता येत नाही. आर्थिक वर्षाच्या अगोदरच याबाबत महासभा आणि स्थायी समितीच्या मंजुरीचे सोपस्कार पार पाडले जातात. त्यामुळे १ एप्रिलपासून माजी सैनिकांना घरपट्टीत सवलत अथवा माफीचा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे. कंपोस्ट खताच्या किटबाबतदेखील नव्या आर्थिक वर्षापासूनच सवलत मिळण्याची शक्यता आहे.‘लोकमत’शी बोलताना आयुक्त गमे यांनी सांगितले की, माजी सैनिकांची संख्या साडेनऊ हजार इतकी आहे. मात्र त्यात नाशिक शहरात कितीजण वास्तव्यास आहे, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे माजी सैनिकांची पत्त्यासह यादी मागविण्यात आली असून, ही यादी मिळाल्यानंतर यातील नाशिकमधील करदात्यांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर सवलतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाRadhakrishna Gameराधाकृष्ण गमे