नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांचे ताबूत प्रत्यक्ष उमेदवारीनंतरही थंडावलेले नाहीत. त्यामुळे नाशिकमध्ये सध्या भाजपात असलेले माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरीची तयारी केली आहे, तर दिंडोरी मतदारसंघात भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट कापल्याने तेदेखील नाराज आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सेना आणि भाजपा युती असली तरी विधानसभा निवडणुकीत उभय पक्षांत बिनसले त्यामुळे यंंदा युती होण्याची शक्यता नसल्याने दोन्ही पक्षांतून अनेक इच्छुकांनी तयारी आरंभली होती. (पान ५ वर)परंतु युती झाल्यानंतर नाशिकमधून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या भाजपातील इच्छुकांची अडचण झाली. ही जागा शिवसेनेकडे असल्याने या पक्षाने खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तयारीत पुढे गेलेल्या अॅड. माणिकराव कोकाटे यांनी आता मागे न फिरता भाजपाने संधी दिल्यास मैत्रिपूर्ण अथवा अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.दरम्यान, दिंडोरी मतदारसंघात विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना भाजपाने उमेदवारी नाकारली असून, राष्टÑवादीकडून ऐनवेळी पक्षात दाखल झालेल्या डॉ.भारती पवार यांना संधी दिली आहे. गेल्यावेळी चव्हाण यांनी डॉ. भारती पवार यांचा दोन लाख ४७ हजार मतांनी पराभव केला होता.