नामपूर : प्रशासकीय मान्यतेचे पत्र मिळाल्याने शेतकºयात समाधान
नामपूर : परिसरातील काकडगाव, मोराणे, अंबासन या गावांतील शेतकºयांसाठी एकेकाळी वरदान ठरलेल्या परिसरातील मोसम नदीवरील बंधाºयाची दुरवस्था झाली होती. या बंधाºयांना प्रशासकीय मान्यतेचे पत्र व प्रत्येकी ५६ लाखांचा निधी प्राप्त झाल्यामुळे कामास गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पूर्वी हरणबारी धरणाची निर्मिती झाली नव्हती. इंग्रज सरकारचे पाणी अडवा पाणी जिरवा धोरण खूप चांगले होते. मोसम नदीवर गाव तेथे दगडी बांधकाम करून बंधारे बांधण्यात आले. यात काकडगाव, मोराणे, अंबासन या गावांतील कोरड शेती ओलिताखाली यावी म्हणून दीडशे वर्षांपूर्वी इंग्रजांनी या बंधाºयाची निर्मिती केली होती. अनेक वर्षे या बंधाºयामुळे मोसमचे पाणी अडविले जात होते. शेकडो एकर जमिनीला याचा फायदा होत होता. हा बंधारा पूर्ण होण्यासाठी काकडगाव, मोराणे, अंबासन येथील शेतकºयांनी खूप प्रयत्न केले आहेत. काकडगाव येथील राजाराम पाटील, अंबासन येथील नारायण कोर, शशिकांत कोर, एम. एस. पाटील, प्रवीण अहिरे, पंढरीनाथ अहिरे, लोटन भामरे यांनी अनेकदा आजी-माजी आमदार यांना निवेदने दिली आहेत. मात्र शासकीय स्तरावर सदर फाइल अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. दि. २६ मे २०१७ च्या शासननिर्णयानुसार मोसम नदीवरील अंबासन व वाघले या गावाशेजारील ब्रिटिश काळातील बंधाºयांना मागील आठवड्यात प्रशासकीय मान्यतेचे पत्र मिळाल्याची माहिती आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली.प्रत्येकी ५६ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, लवकरच कामास प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे शहरप्रमुख नामदेव सावंत यांच्यासह कार्यकर्ते हजर होत. या बंधाºयाच्या दुरुस्तीस निधी प्राप्त झाल्यामुळे परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.