मोरे म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत असल्याने शहरात विकास कामांची रेलचेल सुरू असतानाच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या माध्यमातून प्रथमच तब्बल पाच कोटी पाच लाख रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर केला असून त्यासंबंधित कामांचे प्रशासकीय मान्यता आदेश देखील परिषदेस प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत ३ कोटी ५४ लाख ६७ हजार ६३७ इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. नागरी दलितेतर योजनेंतर्गत ७१ लाख ७८ हजार रुपयांत प्रभाग क्र. १० मधील नाशिक नाका ते पिंपळेश्वर मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी २९ लाख ७० हजार रुपये, प्रभाग क्र. ८ मध्ये बाजार ओटे परिसरात काँक्रिटीकरणासाठी २३ लाख २५ हजार रुपये, रस्ते अस्तरीकरणासाठी १२ लाख ६७ हजार रुपये, प्रभाग क्र. ५ मधील सफाई कॉलनी येथे पेव्हर ब्लॉक बसविणेसाठी ६ लाख १६ हजार रुपये निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती मोरे यांनी दिली.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, गटनेते राकेश खैरणार, महेश देवरे, काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, सभापती राहुल पाटील, संगीता देवरे, शमा मन्सुुरी, सुवर्णा नंदाळे, नगरसेवक बाळू बागुल, सुनीता मोरकर, पुष्पा सूर्यवंशी, सोनाली बैताडे, निर्मला भदाणे, आरिफ शेख, आशा भामरे, रूपाली सोनवणे, भारती सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, शमीम मुल्ला, डॉ. विद्द्या सोनवणे, मनोहर देवरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे उपस्थित होते.