नाशिक : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या मदतनिधीच्या दुसरा टप्प्यातील ३९३ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम वर्ग केली जाणार असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. यापूर्वी १८१ कोटींचा पहिला हप्ता प्राप्त झाला होता. त्याचे वाटप शेतकºयांना करण्यात आलेले आहे.जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान आणि साडेपाच लाख शेतकºयांना बसलेला फटका यामुळे संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि शेती उद्योगावर मोठा परिणाम झाला होता.अगोदर अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसामुळे शेतकºयांचे नुकसान झाल्याने शेतकºयांनी नुकसानभरपाईची मागणी केली होती. जिल्हा प्रशासनाने नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन पंचनामे सुरू केले आणि त्यानंतर सुमारे ५७३ कोटींची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार १८१ कोटींचा पहिला हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता
पीक नुकसानभरपाईचे ३९३ कोटींचे अनुदान प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 1:46 AM