नाशिक : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेला वैयक्तिक शौचालय बांधलेल्या लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाचा ९० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना १२ हजार रु पये याप्रमाणे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यासाठी विहित नमुन्यात ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सन २०१२ मध्ये करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणात शौचालय अनुदानासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधून त्याचा नियमित वापर केल्यानंतर १२ हजार रु पयांचे अनुदान देण्यात येते. मार्च २०१८ मध्ये पायाभूत सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्णासह महाराष्ट् राज्य हगणदारीमुक्त घोषित करण्यात आलेले आहे. मात्र त्यावेळी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झालेला नसल्याने सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान वाटप करता आलेले नाही. याबाबत ग्रामपंचायतींकडूनही सातत्याने अनुदानाबाबत विचारणा करण्यात येत होती. त्यानुसार केंद्र शासनाचा ६३ कोटी, तर राज्य शासनाचा २७ कोटी असा एकूण ९० कोटींचा निधी शौचालय अनुदान वितरणासाठी जिल्ह्णास प्राप्त झाल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.लाभार्थ्यांना पंचायत समितीकडून किंवा ग्रामपंचायतीकडून थेट त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार असून, सदरचे तसेच पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत येथे याबाबत संपर्क साधून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तत्काळ अनुदान वितरण करा : साकोरेसन २०१२ च्या सर्वेक्षणात पात्र असलेल्या व शौचालय बांधून त्याचा वापर करणाºया सर्व कुटुंबांना ३१ जानेवारीपर्यंत प्रोत्साहन अनुदानाचे वितरण करण्याच्या सूचना राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक राहुल साकोरे यांनी दिल्या आहेत.नाशिक जिल्ह्णातील स्वच्छ भारत अभियानाच्या कामाबाबत राहुल साकोरे यांनी बैठक घेऊन विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला. २०१२ च्या सर्वेक्षणात सुटलेल्या कुटुंबांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले असून, त्याची माहिती केंद्र शासनाकडे पाठविण्यात आली आहे. ४या लाभार्थ्यांनीही शौचालय बांधल्यानंतर त्यांना शासनाकडून प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी राहुल साकोरे यांनी दिली.