शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

श्रावणमासात एसटीला मिळाले भरभरून दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:35 AM

धार्मिकदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाºया श्रावण महिन्यात देशाच्या कानाकोपºयातून त्र्यंबकेश्वर येथे भेट देणाºया भाविकांच्या विक्रमी संख्येमुळे एसटी महामंडळाच्या पदरात भरभरून दान पडले आहे.

नाशिक : धार्मिकदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाºया श्रावण महिन्यात देशाच्या कानाकोपºयातून त्र्यंबकेश्वर येथे भेट देणाºया भाविकांच्या विक्रमी संख्येमुळे एसटी महामंडळाच्या पदरात भरभरून दान पडले आहे. श्रावणात देशभरातून भाविकांनी शनिवार, रविवार आणि सोमवारी विक्रमी व इतर दिवशी लक्षणीय गर्दी केली होती. भगवान त्र्यंबकराजा, संत निवृत्तिनाथ महाराज यांचे दर्शन, चतुर्मासनिमित्त कुशावर्तात स्नान, ब्रह्मगिरी, गंगाद्वार, नीलपर्वत आदी ठिकाणांना भेटी, दर सोमवारी ब्रह्मगिरीला मारली जाणारी फेरी तसेच पहिने, दुगारवाडी, त्र्यंबकरोड, जव्हार रस्ता आदि पर्यटन स्थळांना भेट देत वीकएण्ड साजरा करणाºया पर्यटकांमुळे यंदा संपूर्ण श्रावण महिन्यात नाशिक ते त्र्यंबक दरम्यान एसटी महामंडळाच्या ५९१० फेºया झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नाशिक आगाराकडून देण्यात आली. पाचही श्रावणी सोमवारी, नागपंचमी, स्वातंत्र्य दिन, पतेती, अजाएकादशी, श्रावणी अमावास्या अशा महत्त्वाच्या दिवसांना होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक-त्र्यंबकदरम्यान मोठ्या प्रमाणात जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.पहिल्या श्रावणी सोमवारी एसटीद्वारे ७१३२, दुसºया सोमवारी २४,८८४, तिसºया सोमवारी २,४१,०४६, चौथ्या सोमवारी ३४,५५२, तर पाचव्या सोमवारी ३,०७,५८४ प्रवाशांनी नाशिक-त्र्यंबकदरम्यान बसने प्रवास केला.