नाशिक : हिंदु नववर्षाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत यात्र समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून यावर्षी नववर्ष स्वागत सप्ताहात लघुपट महोत्सव, महावादन, महारांगोळी व दोन स्वागत यात्रांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष राजेंद्र दरगोडे यांनी जनकल्याने रक्तपेढी येथे पत्रकार परषदेत दिली. नववर्ष स्वागत समितीच्या माध्यमातून सोमवारी (दि.12) रविवार कारंजा यात्र समितीतर्फे लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बुधवारी (दि. 14) सायंकाळी 5.30 वाजता 20 ढोलपथकांचे एकत्रित महावादन होणार आहे. यात एक हजार वादक सहभागी होणार असून या ढोलवादनातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 121 जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात येणार असल्याची माहिती रोहीत गायधनी यांनी दिली. तर गुरुवारी (दि.15)शहरातील विविध सात विभागांमध्ये अडिचशे चौरस फुटाच्या रांगोळ्य़ा काढण्यात येणार असून शुक्रवारी(दि.16) गोदाघाटावर 25 हजार चौरसफुटाची महारांगोळी काढण्यात येणार आहे. गो-सेवा संकल्पनेवर आधारीत या उपक्रमात सुमारे पाचशे महिला सहभागी होणार आहेत. इंदिरानगर परिसरातील मोदकेश्वर मंदिर येथे ग्रामसेवा, कालिका माता मंदिर परिसरात पर्यावरण सेवा, नाशिकरोड मुक्तीधाम येथे संस्कार सेवा, आडगावच्या वीर सावरकर स्मारक येथे राष्ट्रसेवा, सिडको पेठे हायस्कूल परिसरात शिक्षण सेवा, गंगापूर रोडच्या श्री गुरुजी रुग्णालय येथे आरोग्य सेवा व पाथर्डी फाटा परिसरात सजिव सेवा विषयावर अडिचशे चौरसफुटाच्या महारांगोळ्य़ा काढण्यात येणार आहे. हिंदु नववर्षाच्या स्वागतासाठी पंचवटी विभागातून गुढीपाडव्याला रविवारी (दि. 18) सकाळी 6.34 वाजता श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजापासून गुढीपूजन करून 7 वाजता नववर्ष स्वागत यात्रेस प्रारंभ होणार आहे. ही स्वागत यात्र गणोशवाडी मार्गे, गुरुद्वाराजवळून पाथरवट गल्ली, मालवीय चौक, पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, पेठ नाकामार्गे मखमलाबाद नाका, मालेगाव स्टँड, रामकुंड परिसरातून सकाळी 9.30 वाजता पंचवटी भाजी पटांगण येथे स्वागत यात्रेचा समारोप होणार आहे. तर रविवार कारंजा विभागाची स्वागत यात्र रविवारी याचवेळात साक्षी गणपती मंदिरापासून संत गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉईंटस रेड क्रॉस, सिग्नल, वकीलवाडीतून अशोकस्तंभमार्गे रविवार कारंजा, मेनरोड, धुमाळ पॉईंट व चांदवडकर लेन, दिल्ली दरवाजाकडून भाजी पटांगणावर समारोप होणार आहे.
वीस ढोलपथकांच्या महावादनाने होणार हिंदु नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 2:31 PM
हिंदु नववर्षाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत यात्र समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून यावर्षी नववर्ष स्वागत सप्ताहात लघुपट महोत्सव, महावादन, महारांगोळी व दोन स्वागत यात्रांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देहिंदु नववर्ष स्वागताची जय्यत तयारीवीस ढोलपथकांचे एकत्रित महावादनएक हजार वादक होणार सहभागी गोदाघाटावर काढणार महारांगोळी