लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : कोरोनाक्घे हॉटस्पॉट समजल्या जाणार्या मालेगाव येथे वैद्यकीय सेवा देणार्यांचा घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.घोटी ग्रामीण रु ग्णालयाचे सर्जन डॉ. अविनाश गोर्हे, डॉ. गोसावी, परिचारिका सदगीर यांनी मालेगाव येथे 15 दिवस कोरोना रु ग्णांवर उपचार करून बहुतेक रु ग्णांना कोरोनामुक्त केले. तसेच श्रीकांत काळे यांनी गरजू कुटुंबाना किराणा सामान साहित्यासह मोफत औषधे पुरविले. तर घोटी ग्रामीण रु ग्णालयाचे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार, शिपाई व इतर कर्मचार्यांनी लॉकडाऊन काळत केलेल्या रुग्णांची सेवेची दखलघेत त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. डॉ. सदावर्ते, शाहीर बाळासाहेब भगत, ग्रामपंचायत सदस्य संजय जाधव, डॉ. महेंद्र आडोळे, बाळा आरोटे, काळू भोर, अशोक हेमके, प्रशांत येवलेकर, नीलेश पवार, गोकुळ चव्हाण, सोमनाथ भोर, प्रवीण भटाटे, बालाजी तुंबारे, सोमनाथ भगत, लता जाधव, नंदाबाई भागवत आदी उपस्थित होते. सटाणा नगर परिषद व आमदार दिलीप बोरसे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक गोळ्या वाटप उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला. नगर परिषदेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यापासून विविध उपाय योजनांची अंमलबजावणी सुरू असून आरोग्याच्या दृष्टीने ठरणाºया या उपक्र माबाबतही शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे.यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्षा सोनाली बैताडे, मुख्याधिकारी हेमलता डगळे, सामाजिक कार्यकर्ते राजवर्धन बोरसे, कार्यालय अधीक्षक माणिक वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते दत्तू बैताडे आदी उपस्थित होते.
कोरोनात मालेगाव येथे सेवा देणाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 8:27 PM
नांदूरवैद्य : कोरोनाक्घे हॉटस्पॉट समजल्या जाणार्या मालेगाव येथे वैद्यकीय सेवा देणार्यांचा घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
ठळक मुद्देगरजू कुटुंबाना किराणा सामान साहित्यासह मोफत औषधे पुरविले.