नाशिक : जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने नाशिक विभागात पर्यटन क्षेत्रात मौल्यवान योगदान देणाऱ्या पर्यटनमित्रांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, उपसंचालक रामदास खेडकर, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, दिग्वीजय मानकर, दत्ता भालेराव, दिलीपसिंग बेनिवाल, उमेश पठारे हे होते. नाशिक विभागातील पर्यटन विकास व वृद्धीसाठी अनेक विभागातील व्यक्तींचे सहकार्य लाभत आहे. त्यासाठी सर्वांचेच सहकार्य अपेक्षित असून, पर्यटन विकासासाठी अनेक स्तरातील व्यक्तींचे प्रयत्न, सहकार्य, पर्यटन आवड, पर्यटनात नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती, नवीन संकल्पना मांडून त्या पूर्णत्वास नेणे या गोष्टींचीदेखील आवश्यकता असते. नाशिकचे पर्यटन बहरून ते जगासमोर आणण्यासाठी अशा व्यक्तींचे योगदान मोलाचे ठरते आहे. पर्यटन विकास हे शासकीय व खासगी अशा सर्व क्षेत्रांची एकत्र गुंफलेली माळ असल्याचे प्रतिपादन यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी केले.पर्यटन क्षेत्रात काम करणाºया व्यक्ती संस्था यांची शासनाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या अनेक वेळा मदत होत असते. त्यामुळे जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक कार्यालयाकडून निवडक पर्यटनमित्रांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात शुभदा चांदगुडे, योगेश हराळे, संदीप झावरे (नगर), दादा भाटेवाल, विजय बाविस्कर, प्रमोद बºहाटे (जळगाव), कल्पेश पटेल (नंदुरबार), डॉ. मीनाक्षी गवळी, शामली चौधरी, प्रमोद वराडे, गायत्री बस्ते, दत्तात्रय शेवाळे, वासंती वनारा (नाशिक) यांचा समावेश आहे.
पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मित्रांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 1:03 AM