नाशिक : दमणगंगा-एकदरे आणि अपर वैतरणा-कडवा देव या दोन नदीजोड प्रकल्पांच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणासाठी सविस्तर अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने सुमारे ४१ कोटी रुपये मंजूर केले असून, दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यावर १२ टीएमसी अतिरिक्त पाणी जिल्ह्याला उपलब्ध होणार आहे. दमणगंगा-एकदरे या नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्चिमवाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. राष्टय जलविकास अभीकरणाने तयार केलेल्या पूर्व व्यवहार्यतानुसार या योजनेचे लाभव्यय गुणोत्तर १.४४ इतके आहे. सदर योजनेतून १०० दलघमी पाणी सिंचनासाठी व ४३ दलघमी पाणी बिगरसिंचन प्रयोजनार्थ उपलब्ध होऊ शकते. या योजनेंतर्गत एक धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे. गंगापूर धरणाशी बोगद्याद्वारे वा पाइपलाइनद्वारे जोडण्याचे नियोजन असून, १४३ दलघमी पाणी उपसा पद्धतीने गोदावरी खोºयात वळविण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाने दमणगंगा-एकदरे नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षण आणि अन्वेषणाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी १७ कोटी ७४ लाख १८ हजार रुपये मंजूर केले आहेत. अपर वैतरणा-कडवा देव या नदीजोड प्रकल्पामुळे पश्चिमवाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी गोदावरी खोºयात वळविण्यात येणार आहे. या योजनेचे दोन पर्याय देण्यात आले असून, लाभव्यय गुणोत्तर १ करिता १.६५ व पर्याय २ करिता १.६४ इतके येते. सदर योजनेतून सुमारे २८.३२० हेक्टर सिंचनाचा लाभ मिळू शकतो. तसेच १३७.०१ दलघमी पाणी बिगरसिंचनासाठी उपलब्ध होऊ शकते. या योजनेंतर्गत पाच धरणे बांधण्याचे प्रस्तावित आहे. ही धरणे एकमेकांशी जोडण्यात येणार असून, २०२ दलघमी पाणी उपसा पद्धतीने उचलून गोदावरीवरील खोºयातील देव नदीत वळविण्याचे प्रस्तावित आहे. या नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी २३ कोटी १४ लाख ५४ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, या नदीजोड प्रकल्पांना राष्टय प्रकल्प म्हणून जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मान्यता दिलेली आहे.नाशिक-सिन्नरचा पाणीप्रश्न सुटणारया दोन्हीही नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खोºयात १२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यामुळे नाशिक शहराचा पिण्याच्या पाण्याचा तसेच सिन्नर तालुक्यातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचाच सुटणार आहे. याबरोबरच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरला लागणारे २.६ टीएमसी पाणी सहज उपलब्ध होणार आहे. या नदीजोड प्रकल्पामुळे शिर्डी आणि जायकवाडीलाही पाणी मिळणार असल्याचा विश्वास प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे खासदार हेमंत गोडसे व राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केला आहे.
दमणगंगा-एकदरे आणि अपर वैतरणा-कडवा देव नदीजोड प्रकल्प अहवालास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:29 AM