लासलगाव : लासलगाव व विंचूर परिसरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने तालुक्यातील अन्य गावात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता तातडीने सर्व उपाययोजना करण्यात येत असून, लासलगाव येथील ग्रामीणरुग्णालयात विशेष कोरोना कोविड डीएचसीसी कक्ष निर्माण केला आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.निफाड येथे बाळासाहेब क्षीरसागर यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, निफाडच्या प्रांत अर्चना पठारे, निफाड पंचायत समितीचे उपसभापती शिवा सुराशे, गटविकास अधिकारी संदीप कराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर आदी उपस्थित होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड लासलगाव येथील ग्रामीण रु ग्णालयात विशेष कोरोना डीएचसीसी कक्षात कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार केले जातील. तसेच शासनाच्या नवीन सूचनेनुसार लासलगाव येथील श्री महावीर विद्यालयात निर्माण करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण कक्षात पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचे निकटचे संपर्कातील पंचवीस जणांची देखभाल व उपचार केले जाईल, असे स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी तालुक्यात कोरोनासंंबंधी विशेष काळजी घेण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.---------------------------------------------औषध प्रतिबंधक फवारणीनिफाडच्या प्रांत डॉ. अर्चना पठारे यांनी परिसर स्वच्छता तसेच औषध प्रतिबंधक फवारणी केल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या परिवारातील व परिसरातील रहिवाशी यांचे थर्मल स्किनिंग आशा व अंगणवाडी कार्यकर्ता यांच्या मार्फत केले जात असल्याचे सांगितले.निफाड पंचायत समिती उपसभापती शिवा सुराशे यांनी कोरोना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांची व्यवस्थित देखभाल व उपचार करण्यात यावेत, अशी मागणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी तालुक्यातील मधुमेह, उच्च रक्तदाबाचे रुग्णांची वैद्यकीय तपासणी व उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.
लासलगावी कोविड केंद्रास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 9:14 PM