नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत तयार करण्यात आलेल्या विविध विभागांच्या जलयुक्त शिवार योजनेतील कामांपैकी जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या ३५ कोटींच्या कामांना मान्यता मिळाली आहे. त्यातील सात कोटींच्या कामांना येत्या बुधवारी (दि.७) पहिल्या टप्प्यात प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.त्यानुसार हे प्रस्ताव प्राप्त होताच त्यापैकी साडेतीन कोटींच्या प्रस्तावांना बुधवारी होणाऱ्या बैठकीत प्रशासकीय मान्यता घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने अद्यापही लघुपाटबंधारे पूर्व विभागाची कार्यवाही थंड बस्त्यात आहे. त्यांना मागील वर्षीच्या सेसमधील १ कोटी २२ लाखांच्या कामांना मान्यता नाही. त्यामुळे त्यांचा यावर्षीचा सेसचा निधी खर्च होण्याबाबत सांशकता व्यक्त होत आहे. लघुपाटबंधारे पश्चिम विभागांतर्गत ३५ कोटी ३६ लाखांची जलयुक्त शिवार योजनेची २५८ कामे प्रस्तावित आहेत. त्यात खासगी उद्योग समूह तसेच कंपन्यांच्या सीएसआर निधीतून ४४ लाखांची इगतपुरी तालुक्यात पाच तर दिंडोरी तालुक्यात चार अशी एकूण नऊ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
जलयुक्तच्या ३५ कोटींच्या कामांना मान्यता
By admin | Published: September 02, 2016 1:23 AM