शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

जनसामान्यांप्रती जबाबदारी ओळखून काम करा : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 4:45 PM

विरोधकांची भूमिके त आंदोलने, निदर्शने,निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिका:यांनी व कार्यकत्र्यानी आपली जाबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपच्या नाशिक जिल्हा व शहर मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना कानपिचक्या दिल्या.

ठळक मुद्देजनसामान्यांप्रती पक्षाची जबाबदारी वाढली जाबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करासुभाष देशमुख यांच्या पक्ष कार्यर्त्यांना कानपिचक्यासहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मेळावा

नाशिक : आतार्पयत विरोधकांची भूमिके त आंदोलने, निदर्शने,निवेदने यांच्या माध्यमातून संघर्ष करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत बदल झाला असून जनसामान्यांप्रती पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पक्षातील पदाधिका:यांनी व कार्यकत्र्यानी आपली जाबाबदारी ओळखून जनकल्याणासाठी काम करण्याची गरज असल्याचे सांगत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजपच्या नाशिक जिल्हा व शहर मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना कानपिचक्या दिल्या.भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकत्र्याचा शुक्रवारी (दि.2) मेळावा घेतला. यावेळी ते बोलत होते. त्यांनी कार्यकत्र्याना सरकारच्या योजना जनसामान्यांपर्यत पोहोचिविण्याचे आवाहन केले. राष्ट्र व राज्य वैभवशाली होण्यासाठी सर्वानी संघटीत प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करतांना देशमुख यांनी अप्रत्यक्षरीत्या पक्षांर्तगत स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या मतमतांतर दूर करून एकत्रित काम करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणो आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर लवकरच बुथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त होतील. त्यांनाही प्रशिक्षित करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले. पक्षात कार्यकर्ता पद हेच शेवटर्पयत असते. त्यामुळे कार्यकर्ता म्हणूनच सर्वानी काम करण्याची गरज असून पक्षाशिवाय कोणालाही शून्य किंमत असल्याचे सांगत त्यांनी पदाधिका:यांना सुनावले. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष सुनील बागूल, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महापौर रंजना भानसी, उपमाहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक दिनकर पाटील, विजय साने आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सहकार संस्था उभ्या करा 

राज्याच्या राजकारणाचा मूळ आधार सहकारी संस्था असल्याचे भाजपाने हेरले असून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकत्र्याना नव्याने सहकारी संस्था उभ्या करण्याचे आवाहन केले. तसेच या सहकार संस्थांच्या मध्यमातून संघटनांही आणखी मजबूत करण्याचा सल्लाही देशमुख यांनी यावेळी पदाधिकारी आणि कार्यकत्र्याना दिला.

टॅग्स :BJPभाजपाNashikनाशिकministerमंत्रीSubhash Deshmukhसुभाष देशमुख