वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामरक्षक दलाच्या जुन्या व नव्या सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सहायक निरीक्षक कोते बोलत होते. व्यासपीठावर हद्दीतील पोलीस पाटील व ग्रामरक्षक दलाचे सदस्य उपस्थित होते. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ४५ गावांचे कार्यक्षेत्र आहे. भौगोलिकदृष्ट्याही वावी पोलीस ठाण्याची हद्द मोठी आहे. मर्यादित पोलीस कर्मचाऱ्यांकडून चोऱ्यांना आळा घालताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. या पार्श्वभूमीवर वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामरक्षक दलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, निफाड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर कोते यांनी वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुनर्गठण करण्याचा निर्णय घेतला. नव्याने सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली.
वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी व मालमत्तेचे संरक्षक व्हावे, यासाठी ग्रामरक्षक दलाची पुनर्बांधणी करण्यात आली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बैठक घेत नव्याने ग्रामरक्षक दलात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. माझे गाव, माझी जबाबदारी व माझी मालमत्ता असे प्रत्येकाने समजून आपल्या मालमत्तेचे संरक्षण करावे व प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे आवाहन कोते यांनी केले. महिलांनी दागिन्यांचे प्रदर्शन टाळावे, वाहनचोरी रोखण्यासाठी दुचाकींना बॅक व फ्रंट लॉक बसवावे, वॉचमनची नियुक्ती करावी, प्रवासात स्वत:च्या किमती साहित्याची काळजी घ्यावी, एटीएमवर सुरक्षा रक्षक नेमावेत, प्रतिसाद अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावा... अशा सूचना कोते यांनी केल्या. यावेळी परिसरातील पोलीस पाटील व ग्रामरक्षक दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
इन्फो...
लाठी, शिट्टी व टॉर्चचे वाटप
वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नव्याने ग्रामरक्षक दलाची पुनर्बांधणी करून त्यांना लोकसहभागातून लाठी, शिट्टी व टॉर्चचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे ग्रामरक्षक दलात महिलाही सहभागी झाल्या. यावेळी सहभागी झालेल्या सदस्यांना सूचनापत्राचे वितरण करण्यात आले. रात्रीच्यावेळी गावातील मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी रात्रीची गस्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
फोटो - १७ वावी पोलीस
वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांना सूचनापत्र, लाठी, शिट्टी व टॉर्चचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह ग्रामरक्षक दलाचे सदस्य.
170821\17nsk_10_17082021_13.jpg
वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांना सुचनापत्र, लाठी, शिट्टी व टॉर्चचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह ग्रामरक्षक दलाचे सदस्य.