शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कादवाच्या निवडणुकीत विक्रमी ९३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2022 12:30 AM

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (दि.३) सरासरी ९३ टक्के मतदान झाले असून, पुन्हा कादवा विकास की परिवर्तनला संधी मिळणार, याचा निकाल बंद पेटीत बंदिस्त झाला आहे. रणरणत्या उन्हात वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीतून या निवडणुकीतील चुरस दिसून आली असली तरी वाढती मतदानाची आकडेवारी कुणाला तारक ठरणार हे सोमवारी (दि.४) स्पष्ट होईल.

ठळक मुद्देआज मतमोजणी : मतदानाची वाढलेली टक्केवारी कुणाला तारणार?

दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत रविवारी (दि.३) सरासरी ९३ टक्के मतदान झाले असून, पुन्हा कादवा विकास की परिवर्तनला संधी मिळणार, याचा निकाल बंद पेटीत बंदिस्त झाला आहे. रणरणत्या उन्हात वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारीतून या निवडणुकीतील चुरस दिसून आली असली तरी वाढती मतदानाची आकडेवारी कुणाला तारक ठरणार हे सोमवारी (दि.४) स्पष्ट होईल.प्रचंड उन्हाच्या तडाख्यातही मताचा टक्का वाढल्याने निकालाकडे लक्ष लागले आहे. असे असले तरी कादवा विकास पॅनल व परिवर्तन पॅनलच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच विजयाचा दावा केला आहे. मतमोजणी सोमवारी दिंडोरी येथील सांस्कृतिक भवन येथे होणार असून, निकालही त्यादिवशीच लागणार आहे. यासाठीची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. सुमारे बारा हजार मतदार असलेल्या या संस्थेत जवळपास ९३ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांनी आपल्या स्वतःच्या वाहनाने येऊन मतदान केल्याचे चित्र प्रथमच बघावयास मिळाले आहे. दिंडोरी व चांदवड तालुका, असे दोन तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेले व महाराष्ट्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा कादवा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संपली असून, मतदारांनी आपला निकाल मतपेटीत कुलूपबंद केला आहे.

सकाळपासूनच कादवा विकास पॅनलच्या वतीने पॅनलप्रमुख श्रीराम शेटे यांच्यासोबतच विधानसभा अध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ, बाजार समिती अध्यक्ष दत्तात्रेय पाटील, गणपतराव पाटील आदींसह काही नेते मंडळी प्रचारात सक्रिय होते, तसेच परिवर्तन पॅनलच्या बाजूने माजी अध्यक्ष बाजीराव कावळे, सुरेश डोखळे, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले व तालुक्यातील नेते मंडळी मोठ्या प्रमाणात मतदारांना आवाहन करताना दिसत होते. यावेळी एकूण पाच गटांमध्ये ही निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये कसवे वणी, दिंडोरी, मातेरेवाडी, चांदवड व वडनेर भैरव येथे निवडणूक केंद्र उभारण्यात आले होते.गटनिहाय मतदानाची आकडेवारीवणी गट : ४५५९ पैकी ३८१६ ( ९१.७५ टक्के) दिंडोरी गट : २४८७ पैकी २२९३ (९२ टक्के) मातेरेवाडी गट : २५३५ पैकी २३६४ (९३.२५ टक्के), चांदवड गट : १२६७ पैकी ११८९ (९३.८४ टक्के), वडनेर भैरव गट : १६६८ पैकी १५४० (९२ टक्के), असे एकूण १२.११६ पैकी ११.२०२ इतके मतदान झाले असून, मतदानाची सरासरी एकूण टक्केवारी ९३ टक्के इतकी झाली आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी कुणाला तारक आणि कुणाला मारक ठरणार? हे सोमवारी स्पष्ट होणार असून, अवघ्या जिल्ह्याचे लक्ष कादवा कारखान्याच्या निवडणूक निकालाकडे लागले आहे.फोटो- ०३ श्रीराम शेटे०३ बाजीराव कावळे०३ संपत वक्ते०३ सुरेश डोखळे

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक