लासलगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी लाल कांद्याची या मोसमातील विक्र मी आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून लाल कांद्याची आवक सातत्याने वाढत असून, बुधवारी सकाळी सुमारे १४०९ वाहने बाजार समितीच्या आवारात, तर दोनशे वाहने लिलावाकरिता आवारात येण्यासाठी प्रतीक्षेत होती. बाजार समिती आवारात १४०९ वाहनांतून २४ हजार ५५८ क्विंटल कांद्याची आवक झाल्याने कांद्याचे किमान ७००, कमाल १४७०, तर सरासरी भाव ११५० रुपये प्रतिक्विंटल होते. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील व सचिव बी. वाय. होळकर यांनी विक्र मी आवक झाल्याचे सांगितले. दरम्यान, गुरुवारी ईद-ए-मिलाद, शुक्र वारी नाताळची सुट्टी, तर शनिवारी व रविवारी लिलाव बंद राहणार आहेत. त्यामुळे सोमवारी तब्बल चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कांद्याचे लिलाव होणार असल्याने कांद्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (वार्र्ताहर)
लासलगावी कांद्याची विक्रमी आवक
By admin | Published: December 23, 2015 11:51 PM