नाशिक : मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या २ हजार ७७३ विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज बनवून ‘जय भारत’ महा रॅली मध्ये सहभाग घेत शनिवारी (दि.३०) विश्वविक्रम नोंदवला. या महा रॅलीची वंडर बुक आॅफ रेकॉर्ड इंटरनॅशनलमध्ये नोंद झाली.राष्ट्रप्रेम, देशभक्ती रुजविणे व देशाभिमान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे २००५ पासून अशाप्रकारे जयभारात रॅलीचे आयोजन करण्यात येते. कारगील युद्धात प्रत्यक्ष सहभाग नोंदवणारे मेजर दीपचंद सिंग, कॅप्टन ए. पी. राठोड, सचिन जाधव, संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे, ज्योती कोल्हे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ झाला. हे अभियान संबंध देशपातळीवरती पोहचावे या उद्देशाने आयोजित रॅलीतून मतदान जनजागृती, रस्ता सुरक्षितता विषयांवर जनजागृती करण्यात आली.रॅलीत विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महा रॅलीची वंडर बुक आॅफ रेकॉर्ड इंटरनॅशनल लंडनमध्ये नोंद झाली आहे. या महारॅलीत जगदीश हुल्लुळे यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली.
मानवधनच्या ‘जय भारत’ रॅलीची वंडर बुकमध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 1:22 AM