नाशिक : जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़१०) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहा हजार पाचशे दावे दाखल व ६० हजार दावे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ न्यायाधीश शिंदे यांनी सांगितले की, गत दोन राष्ट्रीय अदालतींमध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक दावे निकाली काढल्याचा विक्रम केला़ त्याप्रमाणेच ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रयत्न आहेत़ शनिवारी होणाºया राष्ट्रीय लोकअदालतीत दावा दाखल प्रकरणांमध्ये फौजदारी ३ हजार २००, धनादेश न वटल्याचे एक हजार ३४३, बँक वसुलीचे २८१, वैवाहिक प्रकरणे ८२०, मोटर वाहन कायद्यान्वये २०० यांसह इतर प्रकरणांचा समावेश आहे़ यापैकी १ हजार ६०० प्रकरणे नाशिक न्यायालयातील असून, त्यात ७९६ फौजदारी प्रकरणे आहेत़ राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यातील ६० हजार दावे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली असून, त्यातील २२ हजार प्रकरणे ही जिल्हा न्यायालयातील आहेत. त्यामुळे या लोकअदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घेऊन प्रकरणांचा निपटारा करावा, असे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस. एम. बुक्के यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोकअदालतीत ६६ हजार दावे महाराष्ट्रात सर्वाधिक दावे निकाली काढल्याचा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:19 AM
नाशिक : न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़१०) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून,सहा हजार पाचशे दावे दाखल व ६० हजार दावे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली़
ठळक मुद्दे जिल्ह्यातील ६० हजार दावेप्रकरणांचा निपटारा करावा