शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

डाळिंबाला विक्रमी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 11:14 PM

लासलगाव : येथील बाजार समितीने सुरू केलेल्या डाळिंब लिलावास शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शुक्रवारी बाजारभाव कमीत कमी २०० रुपये व जास्तीत जास्त २१०० रुपये प्रतिक्रेटप्रमाणे सर्वाच्च दर मिळाले आहेत.

ठळक मुद्देउत्पादकांमध्ये समाधान : लासलगाव बाजार समितीत आतापर्यंत ६१,३२४ क्रेट्सची विक्री

लासलगाव : येथील बाजार समितीने सुरू केलेल्या डाळिंब लिलावास शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शुक्रवारी बाजारभाव कमीत कमी २०० रुपये व जास्तीत जास्त २१०० रुपये प्रतिक्रेटप्रमाणे सर्वाच्च दर मिळाले आहेत.परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता व नेवासा तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळिंब या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांची विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे गेल्या डाळिंब हंगामात लासलगाव मुख्य बाजार आवारावर दररोज सकाळी ९.३० ते दुपारी १ अथवा आवक संपेपर्यंत डाळिंबाचे लिलाव सुरू केलेले आहेत. डाळिंब उत्पादकांनी आपला शेतमाल योग्य प्रतवारी करून एकसारखा डाळिंब २० किलोच्या क्रेट्समध्ये विक्रीस आणल्यास जास्तीत जास्त बाजारभाव मिळत आहे. किडका, पिचका, लहान, खर्डा असलेला डाळींब वेगळ्या क्रेट्समध्ये विक्रीस आणल्यास त्याची खरेदी करणारे व्यापारी येथे उपलब्ध असल्याने डाळिंबाच्या प्रतीप्रमाणे शेतकरी बांधवांना बाजारभाव मिळत आहे. डाळिंबाची विक्री उघड लिलावाद्वारे होत असून, स्थानिक अडत्यांबरोबर अनेक परप्रांतीय व्यापारी लिलावात सहभाग घेत असल्याने स्पर्धात्मक लिलाव होऊन शेतकºयांना उच्चतम बाजारभाव मिळत आहे. लिलावानंतर लगेच इलेक्ट्रॉनिक काट्यावर चोख वजनमाप व रोख चुकवती मिळत असल्याने उत्पादक माल विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीला पसंती देत आहे. चालू हंगामात दि. १३ जुलैपासून आजपर्यंत ६१,३२४ क्रेट्स डाळिंबाची विक्री झाली आहे. लॉकडाउनमुळे बाजारसमितीत कांद्याचे दर कमी होत असताना डाळिंबाला मिळालेल्या दराने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आणखी काही दिवस दर असेच टिकून राहण्याची अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे. बाजार आवारात प्रामुख्याने शेंद्रा, आरक्ता, भगवा या जातीच्या डाळिंबाची आवक होत आहे. व्यापारीवर्गाने खरेदी केलेला डाळिंब हा शेतमाल प्रामुख्याने दिल्ली, बडोदा, अलिगड, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांसह देशातील इतर बाजारपेठेत पाठविला जात आहे. सध्या राज्यातील नाशिकसह अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. ४लासलगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने भविष्यात डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. डाळिंब विक्रीस सोईचे ठिकाण म्हणून लासलगाव बाजारपेठ शेतकºयांना नवा पर्याय निर्माण झाला असून, डाळिंबाच्या खरेदी-विक्रीस प्रतिसाद मिळाल्यास कांद्याबरोबरच डाळिंब विक्रीसाठी बाजार समिती नावारूपास येणार असल्याचे सभापती सुवर्णा जगताप यांनी सांगितले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी