ओझर : ग्रामीण भागात अर्थकारणाला मिळणार गतीओझर : ग्रामीण भागात ज्या गावांत सिटीसर्व्हे नव्हते तेथे यापूर्वी कर्ज घेण्यास मोठी कसरत करावी लागत होती. परंतु गुरु वारी (दि.दि.३) काढण्यात आलेल्या आदेशामुळे ग्रामपंचायत नमुना नंबर ८ उताºयावर कर्ज घेणे सोपे झाले आहे.पूर्वीच्या म्हणजे २०१७ च्या आदेशात ग्रामपंचायत नमुना ८ उतारा हा आकारणी म्हणून होता व त्याला मालकी हक्क म्हणता येत नव्हते.परंतु ज्या गावात भूमीअभिलेख नव्हते तेथील नागरिक कर्जासाठी जेव्हा बँकेत जातं तेव्हा याच उताºयावर त्या बोज्यांची नोंद होत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणी येत असत. त्यामुळे ज्या गावात सिटी सर्व्हे लागू नव्हते तेथील लोकांची कुचंबणा झाली होती व बँकेत गेल्यावर कर्ज मिळत नव्हते. सदरच्या निर्णयामुळे आता सिटी सर्व्हे नसलेल्या ग्रामपंचायत उताºयावर देखील बोजे लावणे शक्य झाल्यामुळे नागरिकांना सहकारी संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवणे सोपे झाले आहे.या निर्णयसाठी आंबे दिंडोरी येथील गुलाबचंद बागमार व ग्रामीण भागातील मुख्य अर्थवाहिनी असलेल्या ओझर मर्चंटस बँकेच्या संचालकांनी याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ यांचेकडे पाठपुरावा केला होता.प्रतिक्रि या...१) सदर निर्णय हा अतिशय चांगला म्हणावा लागेल.यामुळे जेथे केवळ ग्रामपंचायत नोंदी आहेत तेथील लोकांना व्यवसायिक वा इतर कर्ज घेणे शक्य होईल. जेणेकरून ग्रामीण अर्थकारणाला मोठी चालना मिळेल व कोविडमुळे निर्माण झालेली व्यापारातील मंदीला काहीसा हातभार लागेल.- रवींद्र भट्टड, चेअरमन, ओझर मर्चंटस बँक.२) सदरचा निर्णय ग्रामीण भागासाठी चांगला आहे. मात्र ग्रामपंचायतींनी नोंदणीकृत गहाणखत दस्ताशिवाय कर्जदाराच्या नमुना ८ उताºयावर कोणत्याही प्रकारचा बोजा नोंद करू नये, म्हणजे दोघांना भविष्यात अडचण निर्माण होणार नाही.- डी. डी. मोरे, भुमिअभिलेख तज्ञ, पिंपळगाव (ब).
नमुना नंबर आठ उताऱ्यावर नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 3:54 PM
ओझर : ग्रामीण भागात ज्या गावांत सिटीसर्व्हे नव्हते तेथे यापूर्वी कर्ज घेण्यास मोठी कसरत करावी लागत होती. परंतु गुरु वारी (दि.दि.३) काढण्यात आलेल्या आदेशामुळे ग्रामपंचायत नमुना नंबर ८ उताºयावर कर्ज घेणे सोपे झाले आहे.
ठळक मुद्देकरण्यास ग्रामपंचायतींना परवानगी