नाशिक : नवरात्रोत्सवामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, वेगवेगळ्या व्यवसाय उद्योजकांची लगबग वाढली आहे. ग्राहकांची दसऱ्याच्या मुहूर्तावर स्वप्नातील घर खरेदीसोबतच विविध प्रकारच्या वाहन खरेदीला अधिक पसंती मिळत असून, आर्थिक नियोजनाला प्राधान्य देणाºया नागरिकांकडून मात्र गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.नवरात्री आणि दसºयाच्या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेटमध्ये मागणी वाढली आहे. वाहनांची बुकिंग आणि डिलिव्हरी वाढत असून इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन विक्री दालने, सराफी पेढ्यांना झळाळी मिळाली आहे. विविध कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक आॅफर्स, वित्तीय संस्थांकडून अर्थसहाय्य यामुुळे वाहन विक्री गतवर्षीच्या नवरात्रोत्सवाच्या तुलनेत १० ते १२ टक्क्यांनी वाढली आहे. नवरात्रीच्या काळात बाजारात रोज मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असून दसºयानंतर दिवाळीपर्यंत खरेदीचा हा उत्साह असाच कायम राहील, असा व्यावसायिकांना विश्वास आहे. मांगल्याचा सण म्हणून नवरात्रीकडे बघितले जाते. या काळात शुभकार्य होतात. ज्यात खरेदीला विशेष पसंती मिळते. वेगवेगळ्या कंपन्यांनी दिलेल्या आकर्षक आॅफर्स ग्राहकांना खरेदीकरिता प्रोत्साहन देत आहेत. शून्य डाउन पेमेंट, विशिष्ट बँकेची क्रेडिट कार्ड वापरल्यास अतिरिक्त डिस्काउंंट, कॅशबॅक यांसारख्या आॅफर्सची चलती आहे. वित्तसंस्थांनी कर्जप्रक्रिया सुलभ केली असून, शंभर टक्क्यांपर्यंतचे कर्ज आणि सुलभ हप्ते यांमुळे घर, वाहन आणि सोने खरेदीसोबत गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रिक उपकरणांच्या खरेदीकडे ग्राहकांची पावले वळत आहेत.घर खरेदीला अधिक पसंतीपितृपक्षापासूनच घरांची चौकशी ग्राहकांकडून सुरू असून नवरात्रात बुकिंगही होत असून दसºयाच्या मुहूर्तावरही अनेकजण घर खरेदी करण्याचे नियोजन करीत आहे. त्यामुळे विविध बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांमध्ये सध्या ग्राहकांची वर्दळ दिसून येत आहे. २० ते ३० लाखांपर्यंतच्या घरांना मागणी असून, प्रधानमंत्री आवास योजनेतून अनुदानाचा मिळणारा लाभही ग्राहकांना घर खरेदीसाठी प्रोत्साहन देत आहे.विक्रमी वाहन विक्रीची अपेक्षापहिल्या माळेपासूनच कंपन्यांच्या शोरूम्समधूून डिलिव्हरी द्यायला सुरुवात झाली असून, दसºयाच्या मुहूर्तावर विक्रमी वाहन विक्रीची वेगवेगळ्या कंपनीच्या शोरूमचालकांना अपेक्षा आहे. पाचव्या, सातव्या माळेला वाहन बाजारात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली तर काही जणांनी अगदी पहिल्या माळेपासून बुकिंग करून दसºयालाही वाहनांची डिलिव्हरी घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासोबतच दसºयाच्या दिवशी ऐनवेळी येणाºया ग्राहकांनाही वाहने उपलब्ध करून देण्याची तयारी व्यावसायिकांनी ठेवली आहे. त्यामुळे गतवर्षापेक्षा यंदा १० ते १२ टक्के जास्त विक्री होण्याची वेगवेगळ्या शोरूमचालकांना अपेक्षा आहे.
दसरा मुहूर्तावर होणार विक्रमी उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:25 AM