इंदिरानगर : इंदिरानगर-वडाळारोडवरील साईनाथनगर चौफुली व सह्याद्री रुग्णालयालगत असलेल्या स्वयंचलित सिग्नलवर वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालकांकडून नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी दुसरीकडे मात्र हेल्मेट सक्तीचा आग्रह धरून सरकारच्या तिजोरीत लाखो रुपयांचा महसूल गोळा करण्यावर भर दिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सह्याद्री रुग्णालय व साईनाथनगर चौफुलीवर असलेल्या सिग्नलवर चार रस्ते एकत्र येतात. यामध्ये दोन महामार्ग आणि परिसरातील विविध उपनगरला ये-जा करण्यासाठी वडाळा-पाथर्डी हा मुख्य रस्ता असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. परंतु दिवसभर वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने सिग्नलचे वाहनचालक पालन करत नाही त्यातूनच दररोज लहान-मोठे अपघात होऊन हमरीतुमरीच्या घटना घडतात. मात्र त्याची दखल पोलीस यंत्रणा घेत नाही, उलट या सिग्नलच्या आजूबाजूला उभे राहून हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांना अडवून त्यांना हेल्मेटची सक्ती व परिणामी पाचशे रुपये दंड करण्यावर पोलीस भर देतात.परंतु दिवसभर वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने सिग्नल यंत्रणेचे कोणीही पालन करत नाही. तशीच परिस्थिती साईनाथनगर चौफुलीवरील सिग्नलवर आहे. या सिग्नलवर चार रस्ते एकत्र येतात. त्यामध्ये मुंबई महामार्गाकडून जॉगिंग ट्रॅकमार्गे, पुणे महामार्गाकडून वडाळागाव मार्ग व मुंबई महामार्गाकडून विनयनगर मार्गे आणि वडाळा-पाथर्डी रस्ता नगरमार्ग असे मुख्य रस्ते एकत्र येतात. यामध्ये दोन महामार्ग आणि वडाळा-पाथर्डी हा मुख्य रस्ता येत असल्याने दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. परंतु साईनगर चौफुली आणि सह्याद्री रु ग्णालय या दोन्ही सिग्नलवर वाहतूक कर्मचारी अनियमित असल्याने वाहनधारक नियमाची पायमल्ली करत सर्रास मार्गक्र मण करतात. त्यातूनच दररोज लहान-मोठे अपघात होऊन हमरीतुमरीच्या घटना घडतात. तातडीने दोन्ही सिग्नलवर कायमस्वरूपी वाहतूक कर्मचारी देण्याची मागणी शिवसेना प्रणित सुचितानगर मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सरप्रितसिंह बल, अश्विन देसले, विवेक सोनवणे, सुबोध बोरसे, कौशिक पाटील, बबलू शेख यांनी केली आहे.चौफुलीवर वारंवार अपघातसाईनाथनगर चौफुलीवर वारंवार अपघात होऊन जखमी आणि जीवितहानी होण्याच्या घटना घडत असल्याने परिसरातील संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलन केल्यावर सुमारे चार वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली, परंतु वाहतूक पोलीस कर्मचारीअभावी शोभिवंत वस्तू बनून राहिली आहे, अशी तक्र ार नागरिकांनी केली आहे.
वाहनचालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:37 AM