शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
2
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
4
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
5
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
6
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
7
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
8
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
9
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
10
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
11
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
12
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
13
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
14
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
15
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
16
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
17
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
19
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

साडेतीन हजार मागासवर्गीयांची भरती

By admin | Published: June 24, 2016 11:54 PM

दिवाकर रावते : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचा राज्यस्तरीय कृतज्ञता मेळाव्यात घोषणा

नाशिक : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात चालक व वाहक पदांसह सुमारे साडेतीन हजार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून येत्या १५ दिवसात यासंबंधीची आवश्यक प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा राज्याचे परिवहनमंत्री व परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. तसेच कामगारांचा अनेक दिवसांपासून असलेला वेतन कराराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त होताच एसटी कर्मचाऱ्यांच्या कामाचा सन्मान करू, समितीच्या सूचनांनुसार कामगार हिताचे निर्णय घेतले जातील, असे आश्वासनही रावते यांनी दिले. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेतर्फे येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कृतज्ञता मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री बबन घोलप, खासदार हेमंत गोडसे,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, एसटी कामगार सेनेचे सचिव सुनील गणाचार्य आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. याप्रसंगी रावते म्हणाले, एसटी महामंडळातील सर्व कामगार आणि अधिकारी यांना सहा टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुपर स्पेशालिटी रुग्णालयांची सोय उपलब्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कामगारांच्या वेतनवाढीची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित असून त्याविषयीही सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन रावते यांनी दिले. दरम्यान कोणताही कारखाना टिकला तरच कामगार टिकत असल्याचे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांना एसटीची भरभराट झाली तरच कामगारांनाही फायदा होणार असल्याचे सांगतानाच कामगरांना एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी त्यांनी महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांसह दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी व दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती देताना बसस्थानकांवरील उपहारगृहे केवळ महिला बचतगटांना चालवण्यास देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच मराठवाड्यातील दहावी ते बारावीच्या विद्यार्थिनींना मोफ त पास, शिवनेरी बसमध्ये महिलांसाठी १० जागा राखीव करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)