शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

साधुग्राममधील पाइपचा पुनर्वापर

By admin | Published: January 16, 2016 12:48 AM

साडेसहा कोटींची बचत : पाणीपुरवठ्याची कामे मार्गी

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वणी काळात महापालिकेने तपोवनातील साधुग्राममध्ये पाणीपुरवठ्यासाठी टाकलेल्या सुमारे ३९ हजार मीटर लांबीच्या पाइपचा पुनर्वापर शहरातील सहाही विभागात ठिकठिकाणी केला जाणार असून त्यामुळे महापालिकेची सुमारे साडेसहा कोटी रुपयांची बचत होणार आहे. प्रशासनाने त्या संदर्भात विभागनिहाय पाइपलाइन टाकण्याच्या कामांची प्राकलने तयार केली आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत तपोवनासह सुमारे ३३५ एकर जागेत साधुग्रामची उभारणी करण्यात आली होती. साधुग्राममध्ये साधू-महंतांसह भाविकांसाठी पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात आली होती. याशिवाय पंचवटीतील निलगिरी बागेत २० लक्ष लिटर्स क्षमतेचा जलकुंभ, जुन्या लुंगे जलकुंभाशेजारील आवारात २० लक्ष लिटर्स क्षमतेचा जलकुंभ तसेच निलगिरी बागेतच ५० दशलक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्रही खास साधुग्रामसाठी उभारण्यात आले होते. सदर जलकुंभांपासून साधुग्रामसाठी मुख्य जलवाहिनी तसेच अंतर्गत जलवाहिन्याही टाकण्यात आल्या होत्या. या जलवाहिना टाकताना त्यांचा पुनर्वापर करता येईल, अशाच उद्देशाने महापालिकेमार्फत काम करण्यात आले.