सप्ताहात एकूण कांदा आवक २३०७३ क्विंटल झाली असून, लाल कांद्याचे बाजारभाव किमान १५०० रुपये ते कमाल ४१२१ तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकूण आवक १३३७८ क्विंटल झाली असून, लाल कांद्याचे बाजारभाव किमान ७०० ते कमाल ४१११ तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.
सप्ताहात गव्हाच्या आवकीत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात गव्हाची एकूण आवक ७९९ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १४११ ते कमाल १६८० तर सरासरी १६०० रुपयांपर्यंत होते. सप्ताहात बाजरीची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. हरभऱ्याच्या आवकीत वाढ झाली तर हरभऱ्यास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सोयाबीनला स्थानिक व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सप्ताहात मक्याची एकूण आवक १९०११ क्विंटल झाली असून, बाजारभाव किमान ११०० ते कमाल १४२१ तर सरासरी १३५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.