लोकमत न्यूज नेटवर्क.मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात नवीन लाल कांदा काढणीला मागील आठ ते दहा दिवसांपासून प्रतवारी नुसार पध्दतीने काढणीला सुरु वात झाली आहे.दरवर्षी लाल कांदा लागवडीला पाण्याची कमतरता भासत असल्याने लाल कांद्याचे उत्पादन अल्पशा प्रमाणात निघत असते. यंदा मात्र अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी या पावसाच्या पाण्याचा उपयोग रब्बी हंगामातील पिकांना झाला आहे. यंदा मुबलक प्रमाणात पाणी राहील या आशेने मानोरी बुद्रुक, मुखेड, शिरसगाव, पिंपळगाव लेप, जळगाव नेउर, देशमाने, मुखेड फाटा आदी परिसरात शेतकरी वर्गाने यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केली होती. दरवर्षी या लाल कांद्यातून उत्पादन खर्च देखील फिटणे शेतकऱ्यांना महाग असते. यंदा मात्र उत्पादन कमी निघाले असले तरी कांद्याचे भाव दरवर्षी पेक्षा यंदा समाधान कारक असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या लाल कांदा लागवडीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात रोपांची वानवा निर्माण झाली होती. ऐन लाल कांदा लागवडीवेळी अवकाळी पावसाने हौदस घातल्याने लागवडीसाठी आलेली रोपे सडून गेल्याने अपेक्षेप्रमाणे यंदा पाणी असूनही लाल कांद्याची लागवड झाली नसल्याचे दिसून आले आहे. अनेक शेतकऱ्यांनी महागड्या दराने मिळेल तेथून कांद्याची रोपे विकत घेऊन कांदा लागवड केली आहे. लाल कांदा लागवड केलेल्या शेतकºयांनी कांद्याला मुबलक पाणी आण िखते वेळेवर टाकून सुद्धा वातावरणात सातत्याने बदल होत गेल्याने लाल कांदा उत्पादनात घटच झाली असून त्यात कांद्याच्या दरात सध्या चढ - उतार होत असून शेतात काढून ठेवलेला लाल कांदा शेतकरी चोरीच्या धास्तीने घरी आणून टाकत असल्याचे दिसून आले आहे.कांद्याचे भाव कमी होत असल्याने नवीन लाल कांदा काढल्यानंतर शेतकरी वर्ग थेट शेतातून कांदा काढल्यानंतर बाजार समतिीत विक्र ीसाठी नेत आहे. भाव कमी होत चालल्याने कांदा विक्र ीसाठी नेत असल्याचे शेतकरी सांगत आहे. शासनाने तात्काळ कांदा निर्यात खुली करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.लाल कांदा लागवडीपासून तर काढणी पर्यंत झालेला प्रतिएकर खर्च ?नांगरठी - १८०० रु .रोटरी - १८०० रु .सारे पडणे - १००० रु .वावर बांधणे - २००० रु .रोप - २०००० रु .कांदे लागवड - ८००० रु .खत टाकणे - १०००० रु .औषध फवारणी - ५००० रु .कांदे काढणी - ८००० रु .असा एकूण - ५७६०० रु .प्रतिएकर खर्च झालेला असून यंदा प्रथमच लाल कांद्याला भाव समाधानकारक आहे.यंदा मुबलक पाणी असल्याने मी लाल कांद्याची लागवड केली होती. सुरु वातीला कांदा पीक दर्जेदार झाले होते. परंतु मध्यंतरी वातावरणात सातत्याने बदल, कधी ढगाळ वातावरण, कधी दाट पडनारे धुके, दविबंदू ने पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरु वात झाली होती. औषध फवारणी करूनही वातावरण बदलत राहिल्याने कांदा उतापदनात घट झाली असून कांदा काढून लगेच विक्र ीला नेत असून शासनाने कांदा निर्यात खुली करून कांद्याचे भाव वाढवणे गरजेचे आहे.- बाळासाहेब वावधाने, कांदा उत्पादक शेतकरी, मानोरी बु.
लाल कांदा काढणीला सुरु वात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 5:51 PM
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात नवीन लाल कांदा काढणीला मागील आठ ते दहा दिवसांपासून प्रतवारी नुसार पध्दतीने काढणीला सुरु वात झाली आहे.
ठळक मुद्दे यंदा प्रथमच लाल कांद्याला भाव समाधानकारक आहे.