वणी : येथील बाजार समितीत सोमवारी मागणीतील सातत्य व पुरवठ्याची कमतरता यामुळे कांदा दरात तेजीची स्थिती कायम असुन लाल कांद्याला १०,३५१ रूपये भाव मिळाला. उपबाजारात ७२ वाहनामधुन ५१० क्विंटल कांद्याची आवक झाली. १०३५१ रु पये कमाल, ४७०० रु पये किमान तर ८६०० रु पये सरासरी प्रतीक्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात आला. कांद्याच्या मागणीत असलेल्या सातत्यामुळे तेजीचे वातावरण कायम असुन व्यवहार प्रणालीतील उलाढालीमुळे व्यापारी व उत्पादक समन्वयासाठी अनुकुल आहेत. लासलगाव बाजार समितीत सोमवारी लाल कांद्याला ९०५१ रूपये भाव जाहीर झाला.
लाल कांदा दहा हजार पार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:52 PM