मेशी - देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सध्या खरीप हंगामातील पिके त्यातील बाजरी ,मुग ,ऊडीद आदी पिके काढण्यची जोरदार लगबग सुरू आहे . याशिवाय लाल कांदा लागवडीचे कामेही जोरातच सुरू झाली आहेत. या वर्षी पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे बाजरी पिकाचे काहीसे नुकसान झाले आहे. परंतु असे असले तरी पिकांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे बाजरी सोंगणी करून मशिनने बाजरी काढण्यसाठी शेतकरी धावपळ करत आहेत. यात अधूनमधून पावसाचा शिडकावा होतो. त्यामुळे चारा खराब होत आहे. पावसाच्या सततच्या वर्षावाने कांदा लागवडीचे कामेही खोळंबली होती. बियाणे खराब झाली होती. सध्या मुग, ऊडीद ,बाजरी काढण्यासाठी धावपळ सुरु आहे. सध्या सगळीकडे विहिरी आणि विंधनविहीरी तुडूंब भरलीत आहेत. त्यामुळे खरीपाबरोबरच रब्बी हंगामाचे आशादायक चित्र दिसत आहे. या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पिक कांदा आहे. आता लाल कांदा लागवडीचे कामेही जोरातच सुरू झाली आहेत. हवामानाची साथ मिळाली तर या वर्षी उत्पादन वाढलेले असेलच असे दिसत आहे. सध्या आॅक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. रात्री थंडी आणि दिवसा उन जाणवत आहे. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे आक्र मण झाले म्हणून मक्याचे उत्पादन घटणार आहे.
लाल कांदा लागवडीची कामे वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 1:01 PM