उमराणे : येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत दररोज वाढ होत चालल्याने बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याचे चित्र असून, गतसप्ताहाच्या तुलनेत लाल काद्यांच्या दरात तब्बल एक हजार ३०० रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.गेल्या आठवड्यात लाल कांद्यांची आवक कमी असल्याने बाजारभाव तेजीत होते. बाजारभाव तेजीत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण होते. हेच बाजारभाव टिकून राहणे अपेक्षित असताना मात्र जसजशी कांद्यांची आवक वाढू लागली तसतसे बाजारभाव कमी होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी गर्दी केली आहे. त्यामुळे गेल्या सोमवारपासून दररोजच दोनशे ते तिनशे रुपयांची घसरण होताना दिसून आली आहे. दरम्यान, बाजार समितीत १५३० ट्रॅक्टर व पिकअप वाहनांमधून सुमारे २५ हजार क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून, बाजारभाव कमीत कमी ८०१ रुपये, जास्तीत जास्त १७३१ रुपये, तर सरासरी १३५० रुपयांपर्यंत होते.अशी झाली घसरणसोमवार, दि. १ मार्च - कमीत कमी १५०० रुपये, जास्तीत जास्त ३०३५ रुपये, सरासरी २४०० रुपये. मंगळवार, दि.२ मार्च कमीत कमी १५०० रुपये, जास्तीत जास्त २८५० रुपये, सरासरी २१५० रुपये. बुधवार, दि. ३ मार्च- कमीत कमी १२०० रुपये, जास्तीत जास्त २७५१ रुपये, सरासरी २५०० रुपये. गुरुवार, दि. ४ मार्च- कमीत कमी १००० रुपये, जास्तीत जास्त २२५० रुपये, सरासरी १९५० रुपये, शुक्रवार, दि. ५ मार्च- कमीत कमी ८०० रुपये, जास्तीत जास्त २००१ रुपये, सरासरी १७५० रुपये, सोमवार, दि. ८ मार्च - कमीत कमी ८०१ रुपये, जास्तीत जास्त १७३१ रुपये, सरासरी १३५० रुपये.
लाल कांदा दरात १३०० रुपयांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 12:44 AM
उमराणे : येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत दररोज वाढ होत चालल्याने बाजारभावात मोठ्या ...
ठळक मुद्देउमराणे : शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त