सप्ताहात एकूण कांदा आवक ४९१८४ क्विंटल झाली असून लाल कांद्याचे बाजारभाव किमान ५०० ते कमाल ३३५१ तर सरासरी २८५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकूण आवक ३२३३९ क्विंटल झाली असून लाल कांद्याचे बाजारभाव किमान ५०० ते कमाल ३२३१ तर सरासरी २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.
सप्ताहात गव्हाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. हरभऱ्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसून आले. तुरीच्याही आवकेत घट झाली तर बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. तुरीस व्यापारी वर्गाची मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाली. सोयाबीनच्या आवकेत वाढ झाली तर मकाची आवक टिकून होती.