चौकट-
शेपूची जुडी १० रुपये
पालेभाज्यांमध्ये शेपूच्या जुडीला १० ते २० रुपये दर मिळत आहे. कोबी, फ्लॉवरमध्ये कोबीचे दर घसरले असून फ्लॉवरला चांगला भाव आहे. फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. कोथंबिरीत घसरण झाली आहे.
चौकट-
चिकू २० रु. किलो
फळबाजारात सर्वच फळांना चांगली मागणी आहे. घाउक बाजारात चिकू २० ते ४५ रुपये आणि संत्रा १२ ते २० रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे किरकोळ बाजारातही या फळांचे दर वाढलेले आहेत.
चौकट-
तेल, तूप महागले
खाद्यतेलाचे भाव वाढल्याने तुपाचे दरही वाढले असून इतर किराणा मालाचे दर स्थिर आहेत. या दिवसांत ग्राहक डाळी भरून ठेवत असल्याने सर्वच प्रकारच्या डाळींची मागणी असून भाव वाढले आहेत.
कोट -
या सप्ताहात किराणा बाजारात सर्वच मालाला चांगला उठाव होता. ग्राहकी चांगली असल्याने बाजारात सध्या तरी तेजीचे वातावरण आहे. एका कंपणीच्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला तर त्याचा ताण दुसऱ्या तेलावर येत असल्याने सर्वच तेलांचे भाव वाढले आहेत.
- अनिल बुब, किराणा व्यापारी
कोट -
सर्वच शेतकरी काही कांदा पिकवत नाहीत. त्या तुलनेत भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे भाजीपाल्याचे भाव उतरल्याने अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो
- संतोष दौंडे, शेतकरी
कोट-
भाजीपाला आणि किराणा मालाच्या भावात सातत्याने चढउतार होत असल्याने महिन्याच्या खर्चाचे नियोजन करणे अवघड होते. दर महिन्याला कुठली तरी दरवाढ होतच असते
- रंजना नाशिककर, गृहिणी