शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

येवल्यात लाल कांदा आवक टिकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 10:21 PM

योगेंद्र वाघ लोकमत न्यूज नेटवर्क येवला : सप्ताहात येवला बाजार समितीच्या मुख्य आवारासह अंदरसूल उप बाजार आवारावर लाल कांद्याची ...

ठळक मुद्देकांदा समालोचन : राज्यासह परदेशात मागणी चांगली

योगेंद्र वाघलोकमत न्यूज नेटवर्कयेवला : सप्ताहात येवला बाजार समितीच्या मुख्य आवारासह अंदरसूल उपबाजार आवारावर लाल कांद्याची आवक टिकून होती. बाजारभावातवाढ झाल्याचे दिसून आले.कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आदी राज्यांत व परदेशात मागणी चांगली राहिल्याने बाजारभावात वाढ झाल्याचे दिसून आले. सप्ताहात कांदा आवक ६१ हजार ८४६ क्विंटल झाली असून, लाल कांद्याचा बाजारभाव किमान ५०० ते कमाल ३०६१, तर सरासरी २५५० रपये प्रतिक्विंटलपर्यंत होता.उपबाजार अंदरसूल येथे कांद्याची आवक २५ हजार २९० क्विंटल झाली असून, लाल कांद्याचा बाजारभाव किमान ५०० ते कमाल ३०६३, तर सरासरी २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होता.मागील महिन्यात लाल कांद्याची आवक २ लाख ८१ हजार ५३२ क्विंटल झाली होती. बाजारभाव किमान ३०० ते कमाल २४६७, तर सरासरी १९०० रुपये प्रतिक्विंटल होता. चालू महिन्याच्या प्रारंभी लाल कांद्याचा बाजारभाव किमान ५०० ते कमाल २३७७, तर सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल होता. आवकेत घट होत गेली. याबरोबरच परराज्यात, परदेशातही मागणी वाढल्याने बाजारभावात तेजी दिसून येऊ लागली.तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. वातावरणातील बदल, खराब हवामान यामुळे कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. याबरोबरच कांदा वजनातही घटल्याचे दिसून येत आहे. सद्य:स्थितीत बाजारात वाहनांची संख्या अधिक दिसत असताना वजनात माल मात्र कमी बसत आहे.येत्या मार्च महिन्यापर्यंत लाल कांदा बाजारात येत राहणार असून, बाजारभाव टिकून राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वसाधारणपणे तालुक्यात नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये उन्हाळ कांद्याच्या लागवडी सुरू होतात; परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये वातावरण व हवामानातील बदलामुळे ऋतूचक्रच बदलल्यासारखे झाले आहे. परिणामी अजूनही तालुक्यात कांदा लागवड सुरू आहे. हंगाम नसताना पाणी, रोप उपलब्ध आहे, म्हणून कांदा लागवडीचे प्रमाण वाढते आहे. अगद कांदा मार्चपासून बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र, वातावरणातील बदल, खराब हवामान यामुळे या कांद्याचेही उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :onionकांदाMarketबाजार