शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

पोलीस आयुक्तांच्याच आदेशाला रेड सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 9:32 PM

ओझर : मुंबई-आग्रा महामार्गावर गरवारे पॉइंट येथील काही दिवसांपासून बंद असलेली पावती फाड मोहीम पुन्हा जोमाने सुरू झाल्याने वाहनधारक जीव मुठीत घेऊन ब्रेक लावत आहे. याबाबत लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघडकीस आली आहे.

ओझर : मुंबई-आग्रा महामार्गावर गरवारे पॉइंट येथील काही दिवसांपासून बंद असलेली पावती फाड मोहीम पुन्हा जोमाने सुरू झाल्याने वाहनधारक जीव मुठीत घेऊन ब्रेक लावत आहे. याबाबत लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. कोरोनामध्ये झालेल्या लॉकडाऊनमुळे महामार्गावर ओझरपासून पाच किलोमीटरवर एक चेक पोस्ट टाकण्यात आली होती. त्यावेळी असलेल्या नियमांना बॅरिकेड्स लावून अतिशय शिस्तीच्या चौकटीत बसवण्याचे काम उपस्थित पोलिसांकडून सद्रक्षणायसारखे झाले होते. लॉकडाऊनची शिथिलता आता कमी झाली आहे. परराज्यात गेलेल्या जथ्यांची पोटवापसी झाली. त्यांना पूर्ण प्रवासात नेमके ओझरच्या डीआरडीओ जवळ ब्रेक लावून भुर्दंड हमी होत असल्याने स्थानिक व बाहेरील वाहनधारक पुरते त्रस्त झाले होते. त्यानंतर पाटील पेट्रोल पंपाजवळील चौकी ही आयुक्तालयाच्या अखत्यारित येत असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब आयुक्तांपर्यंत गेल्यावर त्यांनी यापुढे वाहनधारकांना कुणीही अडवणार नसून ते काम आरटीओचे असल्याचे जाहीर केल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना कळले. यामुळे ती कित्येक दिवस बंद झाल्यावर सर्वत्र समाधान व्यक्त केले जात होते, परंतु पुन्हा दोन दिवसांपासून भर महामार्गावर वाहतूक पोलीस रस्त्यात येत असल्याचे प्रकार सुरू झाल्याने पोलिसांनादेखील अपघाताचा धोका अधिक वाढला आहे, तर वाहनधारकांनादेखील मोठ्या हिमतीने ब्रेक लावावे लागत आहे. ही वसुली थांबविण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे. (२० ओझर १)--------------नाशिक ते पिंपळगाव हा सहापदरी रस्ता आहे. त्यामुळे सर्वच वाहनांची वर्दळ येथे कायम असते. ज्या तिसऱ्या लेनच्या मध्यभागी गाड्या अडविल्या जातात तेथून अनेक दुचाकीस्वार वेगात असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता तितकीच जास्त आहे. अशीच परिस्थिती कोकणगावजवळसुद्धा बघायला मिळते. येथे तर कधी कधी दुसऱ्या लेनच्या मध्यभागी बॅरिकेड्स लावून गाड्या साइडला लावल्या जातात. अनेक शेतकऱ्यांनीदेखील ही व्यथा व्यक्त केली.

टॅग्स :Nashikनाशिक