अर्थसंकल्पाकडून अपेक्षानाशिक : सर्वसामान्य घरातील गृहिणी आणि महिलांच्या अपेक्षा आगामी अर्थसंकल्पात पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा सर्वस्तरातील महिला व गृहिणींनी व्यक्त केली.गेल्या पंचवार्षिकमध्ये केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना आणल्या होत्या. त्याची काही प्रमाणात पूर्तताही झाली, परंतु महागाई मात्र वाढली. विशेषत: घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी करून महागाई आटोक्यात आणावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे. त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्याबाबत विशेष धोरण असावे, महिला व युवतींना सर्वच क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशीही अपेक्षा अनेक महिला व तरुणींनी व्यक्त केली.घरगुती सिलिंडर स्वस्त व्हावेगेल्या पाच वर्षांत शहरी आणि ग्रामीण महिलांसह सर्वच क्षेत्रातील महिलांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहे. आज खेड्यापाड्यात आणि आदिवासा भागात विजेचे दिवे दिसतात. तसेच चुली ऐवजी गॅसचे सिलिंडर आलेले दिसतात. परंतु गॅस सिलिंडरच्या किमती जास्त असल्याने गोरगरीब महिलांना सिलिंडर घेणे परवडत नाही. त्यामुळे सिलिंडरच्या किमती जास्त असल्याने गोरगरीब महिलांना सिलिंडर घेणे परवडत नाही. त्यामुळे सिलिंडरचे दर कमी करून महागाई कमी करावी. महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी.- अलका खैरनार, गृहिणीगृहउद्योगाला प्रोत्साहन मिळावेआपल्या देशात आधुनिक काळात पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा सर्वच क्षेत्रात सहभाग दिसून येतो. पर्यायाने देश विकासात महिलांचा वाटा मोठा आहे. साहजिकच अर्थसंकल्पाकडूनदेखील महिलांच्या मोठ्या अपेक्षा आहे. युवती आणि महिलांचे बेरोजगाराचे प्रमाण मोठे आहे. यासाठी महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गृहोद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, याकरिता अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य गृहिणींची घराचा गाडा चालविताना आर्थिक ओढाताण होत असल्याने महागाई कमी करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी ठोस उपाय योजावेत.- स्वाती वाघ, गृहिणीतळागाळातील महिलांपर्यंत योजना पोहोचवाव्यातगेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारने अर्थसंकल्पात ज्या काही घोषणा केल्या होत्या त्यांची बहुतांश प्रमाणात पूर्तता झालेली आहे. आगामी अर्थसंकल्पातदेखील याच योजना जास्तीत जास्त समाजघटकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. महागाई कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात यावी. तसेच महिलांसह संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी विशेष धोरण अर्थसंकल्पात आखावे. - संगीता गिते, गृहिणी