शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

उन्हाळ कांदा आवकेत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 7:02 PM

येवला : शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेला कांदा संपत आल्याने व लाल कांदा येण्यास उशीर असल्याने सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावाने आतापर्यंतचा उच्चांक प्रस्थापित केल्याचे दिसुन आले.

ठळक मुद्देयेवला : अंदरसुल मार्केट यार्डवर बाजारभावाचा उच्चांक

येवला : शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेला कांदा संपत आल्याने व लाल कांदा येण्यास उशीर असल्याने सप्ताहात येवला व अंदरसुल मार्केट यार्डवर उन्हाळ कांद्याच्या आवकेत घट झाली तर बाजारभावाने आतापर्यंतचा उच्चांक प्रस्थापित केल्याचे दिसुन आले.कांद्यास देशांतर्गत परदेशात चांगली मागणी होती. सप्ताहात एकुण कांदा आवक ८००१ क्विंटल झाली असुन उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २००० ते ८६०२ रुपये तर सरासरी ६७०० रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार अंदरसुल येथे कांद्याची एकुण आवक ३७९ क्विंटल झाली असून उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान २००० ते ८५०० रुपये तर सरासरी ६१६१ प्रति क्विंटल पर्यंत होते.सप्ताहात गव्हाची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. गव्हास स्थानिक व्यापारी वर्गाची व देशांतर्गत मागणी सर्वसाधारण राहील्याने बाजारभाव स्थिर होते. गव्हाची एकुण आवक ३१ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १९०० ते कमाल २२१६ तर सरासरी २०५० रुपयांपर्यंत होते.बाजरीची आवक टिकून होती तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सप्ताहात बाजरीची एकुण आवक २६९ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान १४०० ते कमाल २४११ तर सरासरी १५५१ पर्यंत होते.सप्ताहात मुगाची एकुण आवक ५३ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान ३५०० ते कमाल ६५०० रुपये तर सरासरी ५६०० रुपयांपर्यंत होते. सप्ताहात सोयाबीनच्या आवकेत घट झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. सोयबीनची एकुण आवक २७४ क्विंटल झाली असुन बाजारभाव किमान ३००० ते कमाल ३८५२ तर सरासरी ३७०१ रुपयांपर्यंत होते.सप्ताहात मकाच्या आवकेत वाढ झाली तर बाजारभाव स्थिर असल्याचे दिसुन आले. मकास व्यापारी वर्गाची मागणी सर्वसाधारण राहिल्याने बाजारभाव स्थिर होते. सप्ताहात मक्याची एकुण आवक ३७५३९ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १३०० ते कमाल १७४२ रुपये तर सरासरी १५००० प्रति क्विंटल पर्यंत होते.तसेच उपबाजार अंदरसुल येथे मक्याची एकुण आवक ८५९३ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १३०० ते कमाल १७७९ रुपये तर सरासरी १५५१ प्रति क्विंटल पर्यंत होते. तसेच उपबाजार पाटोदा येथे मक्याची एकुण आवक ४७८१ क्विंटल झाली असून बाजारभाव किमान १३०० ते कमाल १७५३ रुपये तर सरासरी १६५० प्रति क्विंटल पर्यंत होते.याप्रमाणे माहिती बाजार समितीचे प्रशासक सचिव के. आर. व्यापारे यांनी दिली. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदा