नाशिक : आंतरराष्टय मानकाप्रमाणे शहरात यापूर्वी दीडशे लिटर्स दरडोई पाणीपुरवठा करणे अपेक्षित असताना आता राज्य शासनाच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मात्र पुनर्विलोकनात दरडोई पाण्याचे प्रमाण घटविले आहे. विशेष म्हणजे अनुज्ञेय पाण्यापेक्षा अधिक वापर केल्यास आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. प्राधिकरणाने ठोक पाणी वापर हक्काचे वितरण करण्यासाठी निकष बदलले आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रात यापूर्वी दीडशे लिटर्स दरडोई पाणीपुरवठा केला जात होता. त्यात बदल करून आता १३५ लिटर्स करण्यात आला आहे. ज्या महापालिका क्षेत्राची लोकसंख्या पन्नास लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे. मुंबई, नागपूरसारख्या अशा दोनच महापालिका या निकषात बसत असून, अन्य महापालिकांना मात्र १३५ लिटर्स दरडोई पाणीपुरवठा करावा लागेल. साहजिकच, या महापालिकांना पाण्याच्या आरक्षणावर त्याचा मोठा परिणाम होणार असून, आरक्षणात घट होण्याची शक्यता आहे. प्राधिकरणाच्या या आदेशाविषयी बहुतांशी महापालिका अनभिज्ञ असून, त्याचा फटका त्यांना बसणार असल्याने याबाबत सर्वच महापालिकांना एकत्रित विचार करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे जलाशयातून पाणी उपसा करताना मानकाच्या निकषानुसार पाणी वापरानुसार दरात बदल होणार नाही. मानकापेक्षा अधिक म्हणजेच ११५ ते १४० टक्के पर्यंतच्या पाणी वापरासाठी दीडपट दराने पाण्याचे दर असतील तर नंतर अनुज्ञेय मानकाच्या पुढे म्हणजेच १४० टक्क्यांपेक्षा अधिक दर असतील तर दुप्पट दर आकारले जाणार असल्याने राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना त्याचा मोठा फटका बसणार आहे.दहा ते वीस टक्के दरवाढप्राधिकरणाने याच आदेशात द्वैवार्षिक करवाढदेखील केली आहे. त्यानुसार १ जुलै २०१८ ते ३० जून २०१९ या जलवर्षासाठी दहा टक्के वाढ करण्यात आली आहे, तर १ जुलै १९ ते ३० जून २०२० या जलवर्षासाठी २० टक्के दरवाढ करण्यात आली असल्याने आता वाढीव दराने पाणी घ्यावे लागेल.दरडोई दीडशे लिटर्स पाणीअशा महापालिकांना दीडशे लिटर्स पाणीपुरवठा दरडोई करण्याचे नवे मानक ठरविण्यात आले आहे. याशिवाय ग्रामीण भाग, निमशहरी भागातील पाण्याची मानकेही बदलण्यात आली असून, त्यानुसार ग्रामपंचायतींसाठी ५५ लिटर्स दरडोई, पेरी अर्बन क्षेत्रात ७० लिटर्स, क वर्ग नगरपालिका ७० लिटर्स, ब वर्ग नगरपालिका १०० लिटर्स, अ वर्ग नगरपालिका १२५ लिटर्स दरडोई पाणीपुरवठा करण्याचे निकष ठरविण्यात आले आहेत.
शहरी भागातील नागरिकांच्या दरडोई पाणी वापरात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:51 AM