शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

महापालिकांच्या पाणी आरक्षणात होणार कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2020 11:33 PM

नाशिक : महाराष्टÑ राज्य जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याच्या पुरवठ्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला असतानाच आता नव्या निकषानुसार बहुतांश महापालिकांच्या पाणी आरक्षणातही कपात होणार आहे.

ठळक मुद्देदरडोई पंधरा लिटरने घट : दरवाढीबरोबरच टंचाईला जावे लागणार सामोरे

संजय पाठक।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महाराष्टÑ राज्य जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याच्या पुरवठ्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला असतानाच आता नव्या निकषानुसार बहुतांश महापालिकांच्या पाणी आरक्षणातही कपात होणार आहे. पन्नास लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या महापालिकांचा दरडोई पाणीपुरवठा १३५ लिटर्स इतका करण्यात आल्याने धरणातील पाणी आरक्षण तसेच पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होईल. राज्यातील बहुतांश महापालिका व नगरपालिका जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील जलस्रोतांवर निर्भर आहेत. मोजक्याच महापालिकांनी स्वत:च्या मालकीची धरणे बांधली आहेत. महापालिका क्षेत्रात साधारणत: दरडोई दीडशे लिटर्स पाणीपुरवठ्याचे यापूर्वीचे मानक होते. मात्र त्यात आता बदल केला आहे.महाराष्टÑ जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पन्नास लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या शहरांनाच १५0 लिटर दरडोईचा निकष लागू केला असून, ५0 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांना मात्र १३५ लिटर इतकाच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या मर्यादेचे पालन करण्यासाठी त्याचे दरही त्यानुसारच निश्चित असणार आहेत. निकषानुसार पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकांना नियमित दरानुसार पाणीपुरवठा होईल.परंतु त्यापेक्षा जास्त म्हणजे ११५ ते १४0 टक्के पाण्याचा वापर केल्यास दीडपट दर आकारला जाईल, तर त्याहून अधिक वापर झाल्यास दुप्पट दराने आकारणी होईल. त्यामुळे महापालिकांचे आर्थिक नियोजन आणि पाणीवापराचे लोकांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.तीन पालिका वगळता इतरांना झळमुंबई, ठाणे आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पन्नास लाखांपेक्षा अधिक असल्याने त्या खेरीज कमी लोकसंख्येच्या अन्य सर्वच महापालिकांना या निर्णयाची झळ बसणार आहे.पाणी वापराच्या मर्यादा आवश्यक आहेत. परंतु मर्यादेपेक्षा अधिक वापर झाल्यास थेट दंड आकारण्यापेक्षा महापालिकांना पाणी बचतीसाठी कालावधी देण्यात यावा. तसेच निकष पाळणाऱ्यांना सवलत द्यावी.- उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

पाणी पुरवठ्याचे निकष५0 लाखांपेक्षाकमी लोकसंख्या135लिटर दरडोई५0 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या150लिटर दरडोई

टॅग्स :water shortageपाणीकपातDamधरण