सटाणा : शहरातील प्रभाग क्र मांक एक मधून जाणाऱ्या सटाणा - भाक्षी या संपूर्ण मुख्य रस्त्यासह श्री साईबाबा मंदिरासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर गतिरोधकांना रिफ्लेक्टर बसविले.तालुक्यातील आठ ते दहा गावांना जोडणाºया व सर्वाधिक रहदारी असलेल्या भाक्षी रोडवर वारंवार होणाºया अपघातांचा आळा बसावा, याकरीता रस्त्यावर गतिरोधक उभारून रिफ्लेक्टर बसविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणात येत होता, त्याला यश आले आहे.शहरातून भाक्षीकडे जाणाºया रस्त्यावर भाक्षी ग्रामपंचायत हद्दीतील फुलेनगर, रामनगर तर शहर हद्दीतील वृंदावन कॉलनी, तलाठी कॉलनी या नववसाहती आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक उभारले. मात्र त्यांची ऊंची प्रमाणापेक्षा खूप कमी असल्याने भरधाव वेगाने वाहने जात असत. वाहनांचा वेग पाहून रस्ता ओलांडताना प्रत्येकाला भिती वाटते. त्यामुळे भाक्षी रस्त्यासह श्री साईबाबा मंदिरासमोर गतिरोधकांची ऊंची वाढवून ठिकठिकाणी रिफ्लेक्टर बसवावेत या मागणीसाठी संभाजी फाऊंडेशनने गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले होते.गेल्या सहा महिन्यांपासून याप्रश्नी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर मंगळवारी भाक्षी रस्त्यावरील गतिरोधकांची ऊंची वाढवून रिफ्लेक्टर बसविले.
अखेर सटाणा-भाक्षी रस्त्यावरील गतिरोधकांवर बसविले रिफ्लेक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 7:22 PM
सटाणा : शहरातील प्रभाग क्र मांक एक मधून जाणाऱ्या सटाणा - भाक्षी या संपूर्ण मुख्य रस्त्यासह श्री साईबाबा मंदिरासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर गतिरोधकांना रिफ्लेक्टर बसविले.
ठळक मुद्देवाहनांचा वेग पाहून रस्ता ओलांडताना प्रत्येकाला भिती वाटते.