नाशिक : कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असल्याने सौदी अरेबिया सरकारकडून यंदा आंतरराष्ट्रीय 'हज यात्रा२०२०' पुर्णपणे रद्द करण्यात आली आहे. केवळ स्थानिक लोकांना हज यात्रेसाठी परवानगी तेथील सरकारने दिल्याचे भारतीय हज समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे ज्या यात्रेकरूंनी हज यात्रेसाठी आगाऊ रक्कम समितीकडे भरली होती, ती सगळी रक्कम कोणत्याही प्रकारची वजावट न करता संबंधित इच्छुक यात्रेकरूंना परत दिली जाणार असल्याचे पत्रक काढले आहे.दरवर्षी इस्लामी कालगणनेच्या ‘जिलहिज्जा’ महिन्यात पवित्र हज यात्रासौदी अरेबियामधील मक्का-मदिना येथे पार पडते. या ठिकाणी जगभरातून लाखोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र येत हज यात्रा विधीवत पूर्ण करतात. सुमारे सव्वा महिनाभर यात्रेकरू मक्का व मदिनामध्ये मुक्कामी असतात. बकरी ईदचे (ईद-उल-अज्हा) नमाजपठण आटोपल्यानंतर हळुहळु यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू होतो. इस्लामी संस्कृतीत हज यात्रेला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त असून धर्माच्या पाच प्रमुख मुलस्तंभांपैकी एक ‘हज’ आहे. प्रत्येक मुस्लीम आपल्या उभ्या आयुष्यात एकदा तरी हज किंवा ‘उमराह’ला जाण्याची आकांक्षा बाळगून असतो.यावर्षी हज यात्रेवर कोरोना या महाभयानक आजाराचे सावट आहे. यामुळे सौदी सरकारने हज यात्रा आंतरराष्ट्रीय स्तरावर न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत भारतीय हज समितीकडून सातत्याने सौदी सरकारकडे पाठपुरावा केला जात होता. नुकतेच समितीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात आंतरराष्ट्रीय हज यात्रा-२०२० ही पुर्णपणे सौदी सरकारकडून रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
रक्कम मिळणार परत; कोरोनामुळे यंदाची ‘हज’ यात्रा रद्द!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 4:38 PM
दरवर्षी इस्लामी कालगणनेच्या ‘जिलहिज्जा’ महिन्यात पवित्र हज यात्रा सौदी अरेबियामधील मक्का-मदिना येथे पार पडते.
ठळक मुद्देसौदी सरकारकडून घोषणाहज समिती करणार पूर्ण रक्कम परत