नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथील पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहीरी मालकाने पाणी देण्यास नकार दिल्याने येथील उपसरपंच नारायण पवार, अयुब शेख, राजेंद्र लाठे आणि पदाधिकाऱ्यांना नांदगाव येथील तहसीलदार भारती सागरे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने गाव बंद ठेवून निषेध नोंदविला.हा प्रकार सोमवारी (दि.२८) घडला. तहसीलदारांनी सहकार्याची भुमिका न दाखविता तुमच्या गावचा पाणी प्रश्न तुमच्या कडून सुटत नसेल तर राजेनामे द्या. असा सल्ला दिला. आणी येथील शिपायास बोलावून घेत पोलीसांना त्वरीत बोलावून यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे म्हणाल्या उपसरपंच आणी पदाधिकाºयांना तहसीलदार सागरे यांच्याकडून मिळालेल्या उर्मट वागणुकीमुळे आज येथील आठवडे बाजारसह गावातील दैनंदिन व्यवहारात बंद ठेवून निषेध नोंदवला बंदमध्ये मेडिकल, वैद्यकीय व्यवसाय,शाळा वगळण्यात आले होते. त्याबाबत निवेदन उपविभागीय अधिकारी नाशिक, जिल्हाधिकारी नाशिक, उपविभागीय अधिकारी येवला आणि पोलीस निरीक्षक नांदगाव यांना आॅनलाईन पाठवून मंगळवार दि. २९ रोजी आठवडे बाजारसह गावातील दैनंदिन व्यवहारात बंद ठेवला. यावेळी येथील ग्रामदैवत पिनाकेश्वर महादेव मंदिरासमोर उपसरपंच नारायण पवार, राजेंद्र लाठे, अयुब शेख, गुलाब पाटील, मारुती सोनवणे, कैलास तुपे, बंडु पाटील, सुभाष पवार, नामदेव वर्पे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थितीत होते.दरम्यान बारा वाजेच्या सुमामरास नायब तहसीलदार योगेश जमदाडे, तलाठी योगिता निकम, मंडल अधिकारी बाळनाथ पैठणकर हे येताच त्यांना उपसरपंच आणि पदाधिकाºयांना तहसीलदार सागरे यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणूकीमुळे नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी केलेल्या मध्यस्थीचा नागरिकांनी मान ठेवत व नायब तहसिलदार योगेश जमदाडे यांनी घडलेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली यावेळी राजेंद्र लाठे यांनी तलाठी योगिता निकम व मंडल अधिकारी पैठणकर यांना येथील पाणी समस्या माहीत होती त्यांनी तहसीलदार सागरे यांना सांगितली असती तर धडलेला अनुचित प्रकार घडला नसता असे म्हणाले. यावेळी घडलेल्या घटणेची वरिष्ठ पातळीहुण चौकशी करण्यात यावी म्हणून ना.तहसीलदार जमदाडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीकारभारी महादु पवार, भाटु छोटु चव्हाण यांच्या गट नंबर २१ आणी बद्री महादु चव्हाण यांच्या दि. ९ जानेवारी ते ३० जुन २०१९ पावतो कालावधीसाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींची पहाणी करणेसाठी एकित्रतपणे जावून विहीर मालकांना समज देउन नकार दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल याबाबत माहिती देऊन विहीरीचा ताबा पाणी पुरवठा करणेसाठी ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आला. (फोटो ३० वेल)