शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

दरवाढ फेटाळूनही करआकारणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 1:10 AM

नाशिक : वार्षिक भाडेमूल्य वाढीमुळे शहरातील मिळकतींवर होणाऱ्या करवाढीवरून रणकंदन झाले असून, महासभेने दरवाढ फेटाळली जात असतानादेखील अंमलबजावणी मात्र सुरू झाली असल्याने खळबळ उडाली आहे. नव्या मिळकतींना पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर त्यानुसार घरपट्टी आकारणीसाठी मिळकतधारकाने विनंती केल्यानंतर नव्या दराने घरपट्टी लागू होत असून, करवसुली विभागाच्या सूत्रांनीच ही माहिती दिली आहे.आयुक्तांनी ३३ ...

नाशिक : वार्षिक भाडेमूल्य वाढीमुळे शहरातील मिळकतींवर होणाऱ्या करवाढीवरून रणकंदन झाले असून, महासभेने दरवाढ फेटाळली जात असतानादेखील अंमलबजावणी मात्र सुरू झाली असल्याने खळबळ उडाली आहे. नव्या मिळकतींना पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर त्यानुसार घरपट्टी आकारणीसाठी मिळकतधारकाने विनंती केल्यानंतर नव्या दराने घरपट्टी लागू होत असून, करवसुली विभागाच्या सूत्रांनीच ही माहिती दिली आहे.आयुक्तांनी ३३ ते ८२ टक्के करवाढ करणारा प्रस्ताव महासभेवर मांडला होता. त्यानंतर महासभेने दुरुस्ती करून सरसकट म्हणजेच निवासी, बिगर निवासी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी सरसकट १८ टक्के करवाढ मान्य केली.  परंतु त्यांनतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ३१ मार्च रोजी नवीन वार्षिक भाडेमूल्य घोषित केले त्यानुसार पूर्वी पन्नास पैसे दर असलेल्या निवासी भागात गावठाण चाळीस पैशावरून एक रुपये ६० पैसे असे मूलभूत दर असून, कौलारू घर, पत्र्याचे शेड असे वेगवेगळे दर आहेत.  शहरात नव्याने आढळून आलेल्या सुमारे ५९ हजार मिळकती तसेच नव्याने बांधकाम होणाºया मिळकतींसाठी महापालिकेने करयोग्य मूल्य आकारणीत पाच ते सहापटीने वाढ केली. यापुढे बांधीव इमारतींबरोबरच आजूबाजूच्या मोकळ्या जमिनींवरही सदर मिळकतधारकांना घरपट्टी आकारली जाणार आहे. शहरात सद्य:स्थितीत चार लाख १२ हजार मिळकती आहेत. त्यातील १७ हजार मोकळ्या भूखंडांवर करआकारणी केली जाते. परंतु, ज्या मोकळ्या जमिनींवर अद्याप कर आकारणी झालेली नाही, त्यांना या नव्या कररचनेनुसार मिळकत कर भरावा लागणार होता.करवाढीवरून महापालिकेत आणि बरीच भवती न भवती झाली. शहरात आंदोलने पेटल्याने भाजपाचे आमदार रस्त्यावर उतरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा विषय गेला त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात करवाढीच्या विरोधात महासभा झाली. त्यावेळी १०५ नगरसेवकांनी विरोध करून करवाढ फेटाळली. त्यानंतर याच महिन्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी एका हॉटेलमध्ये बैठकही घेतली होती. मात्र त्यावर अद्याप अधिकृत तोडगा निघाला नसताना महापालिका आयुक्तांचे मार्च महिन्यातील वार्षिक करमूल्य सुधारणा आदेश मात्र कायम असल्याने पूर्णत्वाचा दाखला मिळणाºया मिळकतींना नवीन वार्षिक भाडेमूल्यानुसार घरपट्टी लागू होत आहे.ती करआकारणी स्थगितखुल्या भूखंडावरील करआकारणी करताना त्यातील दरवाढीवरून बराचवाद झाला. आयुक्तांनी खुल्या जागेवरील कर आकारणीचे सर्वाधिकार आयुक्तांना असल्याचे समर्थन केले, परंतु मोकळ्या भूखंडावरील दर आकारणीत पन्नास टक्के दर कमी केल्याचे जाहीर केले होते. परंतु करवाढीवरून वाद सुरू झाल्याने त्यासंदर्भातील प्रत्यक्ष पाहणी आणि कर आकारणी अद्याप सुरू केलेली नाही. परंतु मिळकतींवर मात्र करआकारणी सुरू केली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे